https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : How to determine Good Writing in 2022

Followers

Showing posts with label How to determine Good Writing in 2022. Show all posts
Showing posts with label How to determine Good Writing in 2022. Show all posts

How to determine Good Writing in 2022? and Why read?

 लेखकाचा वाचक आणि वाचनाशी संबंध...

            तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? एका लेखकाचा वाचन आणि वाचक यांच्याशी थेट संबंध असतो. कारण एक लेखक हा वाचनाशिवाय कधीच लिहू शकत नाही आणि वाचकाशिवाय लेखकांच्या लिखाणाला कधीच अर्थ लागणार नाही. म्हणुन मला वयक्तिकरित्या असं वाटते की, लेखकाने वाचन आणि वाचकांना कधीच विसरू नये. कारण वाचकांमुळे फक्त लेखकाच्या लेखनाला अर्थ च लागत नाही तर त्यांच्या प्रत्येक्ष किव्वा अप्रत्यक्ष प्रतिक्रियांमुळे लेखकाला प्रेरणा देखील मिळत असते. आज मी अशाच एका वाचक बद्दल लिहीत आहों ज्या स्वतः सुद्धा एक उत्तम लेखिका/कवीयित्री आहेत. माझ्यापेक्षा त्या कदाचीत 1 ते 2 वर्षाने जरी लहान असतील मात्र विचारांनी माझ्यापेक्षा देखील फार मोठ्या आहेत असं मला वाटते. त्यांचं नाव “वैष्णवी संतोष खलसे” असं आहे. त्यांचा मी फार फार आभारी आहो. कारण त्यांनी माझ्या प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देऊन मला वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्यासाठी एक प्रकारे प्रेरीतच केलं आहे. त्यामुळे आजचा हा लेख त्यांनीच विचारलेल्या एका प्रश्नावर आहे.

त्यांचा आवडला कॅरेक्टर मोटू
                   एके दिवशी वैष्णवी मॅडम नी मला विचारलं की सर, “आपण नेहमी म्हणतो की चांगलं लिखाण वाचलं पाहिजे, चांगलं लिखाण वाचलं पाहिजे तर मग चांगलं लिखाण आपण कसं निवडायचं? आणि वाचन का करावं? किव्वा कशासाठी करावं?” मी फार मोठा लेखक नाही परंतु मला वयक्तिकरित्या असं वाटते की, लिखाण हे कधीच चांगलं किव्वा वाईट नसते, लिखाण हे लिखाण असते मात्र त्यातून आपण चांगलं काय घेतो आणि वाईट काय घेतो यावर अवलंबून असते.  आता उदाहरणार्थ बघितलं तर, आपल्याकडे असे कित्येक पुस्तके किव्वा लेख आढळतील ज्यात भाकड (विश्वास न करता येणारे) कथा आहेत ज्यांच्या आधारे समाजाची दिशाभूल केली जाते. परंतु आपण ते कुणाच्यातरी सांगण्यावरून वाईट आहे म्हणून वाचणारच नाही तर आपल्याला त्यावर विचार करता येईल का? आणि जर आपण त्यावर विचार च केला नाही तर ते लिखाण किव्वा पुस्तक कुठं वाईट आहे हे कळेल का? आणि आपल्याला त्यात काय वाईट आहे हेच कळणार नाही तर आपल्याला चांगलं काय आहे हे देखील कळणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटते की, लिखाण हे कधीच चांगलं किव्वा वाईट नसते तर त्यातल्या काही बाबी चांगल्या किव्वा वाईट असतात. ते आपल्याला फक्त वाचून नाही तर चांगला विचार करून ठरवायच्या असतात की त्यात काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, आपण वाचन का करावे? किव्वा कशासाठी वाचन करावे? तर याचं एकच उत्तर आहे. वाचनाने माणसाची विचार करण्याची क्षमता वाढते. आणि एकदा विचार करण्याची क्षमता वाढली की त्या व्यक्तीला चांगलं लिखाण कोणतं? आणि वाईट लिखाण कोणतं हे निवडण्याची गरज भासणार नाही. तर वाईट मधून सुद्धा चांगलं आत्मसात करायची कला अवगत होते.  

              मी वर सांगितल्या प्रमाणे फार मोठा लेखक नाही परंतू मी माझ्या परीने उत्तर देण्याचं प्रयत्न केलो. एक लेखक म्हणून माझ्या वाचकांप्रती ही माझी जबाबदारी आहे की, मी माझ्या वाचकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तसेच मी माझ्या सर्व वाचकांना हे सांगतोय की, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटते किव्वा मला जे काही विचारावं वाटते ते नक्की विचारा. मी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. परत एकदा मी “वैष्णवी संतोष खलसे” तसेच इतर वाचकांचा फार फार आभारी आहो कारण तुम्हीच मला एवढं मोठं केलं आहे.

धन्यवाद... 

तुमचाच लाडका

आशु छाया प्रमोद(रावण)

7820994148