https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : Who is the Ambedkarwadi? खरा आंबेडकरवादी कोण?

Followers

Who is the Ambedkarwadi? खरा आंबेडकरवादी कोण?

 आंबेडकर साऱ्यांचा बाप आहे.....

Do. Babasaheb Ambedkar 
                                      प्रस्तुत लेख लिहिण्यापूर्वी मी प्रथमतः परम् पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. कारण त्यांच्यामुळेच आज माझ्या हातात लेखणी आहे आणि तसेच लिहिण्याचं, एखाद्या विषयावर आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देखील मिळालं आहे. माझे एक मित्र विद्रोही कवी/लेखक रोहित शिवाजीराव पेटारे उर्फ मिर्झा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक फार चांगली कविता लिहिली. ती कविता मला पटली नाही अशातला भाग मुळीच नाही तर ती कविता मला फार आवडली. परंतू ते म्हणतात ना नाण्याच्या दोन बाजू असतात अगदी त्याच प्रमाणे प्रत्येकच गोष्टीच्या दोन बाजू असतात. कवितेची तीच दुसरी बाजू स्पष्ट करण्यासाठी मी प्रस्तुत लेखक लिहीत आहो. 

                      ती म्हणाली,

                      आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे

                      आणि मी इथच तिच्या प्रेमात पडलो.......

                                         अगदी खरं आहे मिर्झा, आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे यात काडी मात्र शंका नाही. मात्र आपण 'आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे.' असं ऐकून ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो ती व्यक्ती खरचं आंबेडकरवादी आहे का? की ती व्यक्ती देखील आपलं काम काढून घेण्यासाठी आम्हाला भावनिक करण्याच्या प्रयत्न करत आहे. यात मात्र मला नक्कीच शंका आहे. कारण एक दिवस कुणीतरी येऊन भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो आणि आपल्याकडून च नारेबाजी करून मत मागतो. आणि आपण सुद्धा याने बाबासाहेबांचं नाव घेतला म्हणजे तो आंबेडकरवादी च असेल असं समजून भावनेच्या भरात त्याला निवडून देतो. आमच्या भरोशावर तो निवडून येतो आणि घरी बसून खातो परंतु आपण मात्र फक्त नारेबाजी करत राहतो. कारण त्याने डॉ. बाबासाहेबांचं नाव घेतलं असतं म्हणून आपण त्याला डोक्यावर चढवलो परंतू तो आंबेडकरवादी आहे किव्वा नाही याचा विचार मात्र आपण करू शकत नाही. Tik Tok वर एक मुलगा एक व्हिडिओ बनवतो त्यात तो पांढरे कपडे घालून एका पांढरी साडी घालणाऱ्या मुलीसोबत लग्न करायला विहारात जातो आणि background मध्ये एक गाणं असतो, पांढरे कपडे घालून बुद्ध पूजेला बसावं आपण त्यालाही Viral करतो. मात्र त्याने त्याच्या डाव्या पायात घातलेला काळा धागा मात्र कुणालाही दिसत नाही जो धनलाभ होण्यासाठी तो घातलेला असतो कारण आम्ही बाबासाहेब किव्वा बुद्धांचं नाव घेतलं की आपण त्याला डोक्यावर घेतो मात्र बुद्ध धर्मात मूर्ती पूजा किव्वा अंधश्रध्देला स्थान नाही याचा विचार मात्र आपण करू शकत नाही. असच एकदा कुणालातरी म्हटलं होतं की, मूर्ती पूजा करू नये तर तो म्हणाला की, मग आम्ही मुर्त्या फोडायच्या का? कित्ती लाजिरवाणी गोष्ट आहे, आम्हाला मुर्त्या, पुतळे, स्मारके का तयार केलेली आहेत ते देखील माहिती नाही. मुर्त्या, पुतळे किव्वा स्मारके हे पुढच्या पिढीला खरा इतिहास सांगण्यासाठी कामात येणार आहेत. अन्यथा समोरच्या पिढीला काल्पनिक कथा सांगून खरा इतिहास गहाड केला जाईल. मी मूर्ती पूजा करू नका म्हटलो मात्र याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मुर्त्या पुतळे किव्वा स्मारके फोडा. परंतु आपण या सर्व गोष्टीचा कधीच विचार करू शकत नाहीत कारण आपण आपली विचार करण्याची क्षमता च गमावून बसलो आहोत. म्हणुन आपल्याजवळ कुणीही येऊन डॉ. बाबासाहेबांचं नाव घेतो आणि आपल्याला भावनिक करून आपलं स्वार्थाचं काम करून निघून जातो. ही परिस्थिती फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशीच संबंधित नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशीही संबंधित आहे. १९ फेब्रुवारी आली की कॉलेज च्या कट्टयावर बसून मुलींची थट्टा करणारे कित्येक तरुण मुलं शिवरायांसारखी दाढी वाढवून कपाळी चंद्रकोर लावून बाहेर पडतात. हातात भगवे झेंडे धरून गावभर फिरतात मात्र शिवरायांच्या एकाही विचारांवर ती मुलं चालतांनी दिसत नाहीत. फक्त १९ फेब्रुवारी आली की यांच्या अंगात शिवराय संचारतात. अशाच शिवभक्तांचा राजकारणी सर्रास वापर करून घेतात.

Chhatrapati Shivaji Maharaj 
                                आपल्या जवळ कुणीही येऊन शिवरायांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो आणि आपण त्यांच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवतो. मात्र ते खरचं त्यांच्या विचारांवर चालतात किव्वा नाही याचा विचार मात्र करीत नाही. यांच्या जयंत्या आल्या की DJ लावून नाचण्यात एवढे गुंग झालो की आपला वाचनाकडे दुर्लक्ष झाला आणि हेच कारण आहे की आपण विचार करण्याची क्षमता गमावून बसलो. आज बघायला गेलं तर एका छोट्याशा गावात देखील १० ते २० हजार किंबहुना त्यापेक्षाही अधिक रुपये आपण दरवर्षी या जयंत्या मध्ये DJ वर नाचण्यात खर्च करतो. परंतु आज किती गावात किती ग्रंथालयं आहेत आणि त्या ग्रंथालयांमध्ये शिवरायांचे, डॉ.बाबासाहेबांचे तसेच इतर थोर पुरुषांचे किती पुस्तके आहेत याकडे लक्ष घालत नाही. त्यांच्या जयंत्यामध्ये एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा जे तेच पैसे त्या ग्रंथालयासाठी खर्च केले तर ०४ ते ०५ वर्षात चांगलं ग्रंथालय प्रत्येक गावात स्थापन होतील आणि प्रत्येक लोकांना शिवरायांचे, डॉ.बाबासाहेबांचे तसेच इतर थोर पुरुषांचे विचार वाचायला मिळतील. आणि मला नाही वाटत या थोर पुरुषांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी यापेक्षा चांगला कुठला मार्ग असेल!

Conclusion:-

                      मला एवढंच म्हणायचं आहे की, कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. बाबासाहेबांचं नाव घेणारं किव्वा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारं खरचं त्यांच्या विचाराचं आहेत का? याचा विचार करून नंतरच विश्वास ठेवा. तसेच जयंती आली की DJ लावून नाचण्यापेक्षा त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा हीच खरी जयंती आहे.

                 प्रस्तुत लेख लिहिण्यासाठी मला तुझ्या कवितेवर आपले विचार व्यक्त करायला मला परवानगी दिल्याबद्दल रोहित शिवाजीराव पेटारे उर्फ मिर्झा भाई तुझे खूप खूप आभार! माझ्याकडुन नकळत पणे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ कर तसेच माझ्यामुळे नकळत पणे कुठल्याही समाजातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागतो. माझा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा न्हवता. काही चुकलं असेल किव्वा काही सुटलं असेल तर कमेंट द्वारे मला नक्कीच मार्गदर्शन करा मी तुमच्यापेक्षा फार काही मोठा नाही मी एक विद्यार्थी च आहों. मला जे काही वाटलं ते मी तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केलो.


धन्यवाद....

तुमचाच लाडका 

आशु छाया प्रमोद

मु.पोस्ट:- उमरी/लवारी 

ता. साकोली, जिल्हा:- भंडारा

4 comments:

  1. ✔️✔️✔️✔️अगदीच बोल्ड विषयावर मत व्यक्त केलं सर खूप छान

    ReplyDelete