भांडण: एक धोक्याची घंटा
जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे पती-पत्नी चं नातं आहे. कारण एकदा भाऊ आपल्याला सोडून जाईल बहीण सोडून जाईल Girlfriend/Boyfriend, Friends सर्व सोडून जातील एवढंच नाही तर आई वडील सुद्धा आयुष्यभर साथ देत नाहीत पण पती आणि पत्नी कधीच एकमेकांना साथ सोडत नाहीत. एक वेळ तर अशी येईल की, आपल्या पोटचा पोरगा सुध्दा आपल्याला सोडून जाईल पण पती पत्नी कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत. पती-पत्नी हे दोघे जणू आयुष्य नावाच्या गाडीचे दोन चाक आहेत. त्यामधील एक चाक जरी थोडा ही का होईल डगमगला तर आयुष्य नावाच्या गाडीची वाट चुकेल आणि आयुष्य संपेल. आणि या मागचं एकमेव कारण म्हणजे भांडण आहे. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की, नात्यामध्ये भांडण होणं गरजेचं आहे. ज्या नात्यात भांडण होत नाहीत त्या नात्यामध्ये प्रेम नाही. परंतु हा च तुम्हा सर्वांचा गोड गैरसमज आहे. नात्यामध्ये छोटंसं जरी भांडण होत असेल तर ही फार मोठी धोक्याची घंटा आहे.
![]() |
आज मी तुम्हाला एका मध्यमवर्गीय परिवाराची छोटीसी Story सांगतोय. पती चं नाव रवी आणि पत्नी चं नाव अंजली होतं. रवी हा Goverment Office मध्ये Job ला होता आणि अंजली Housewife होती. दोघांचं ही लग्न होऊन आज जवळपास 20 वर्षे झाली होती त्यांना एक 17 ते 18 वर्षाचा मुलगा(राहुल) सुद्धा होता. आता तुम्हाला वाटत असेल की, है तिघेही गुण्या-गोविंदाने राहत असणार. तर तुम्ही चुकीचे आहात हे तिघेही कधीच गुण्या-गोविंदाने राहिले नाही कारण रवी आणि अंजली मध्ये क्षुल्लक कारणांवरून छोटं मोठं भांडण नेहमीच होत राहायचं. कधी रवी ला Office मध्ये उशीर व्हायचा तर अंजली त्याच्यावर ओरडायची तर कधी रवी Office मधून लवकर आला आणि अंजली त्याला घरात दिसली नाही तर रवी अंजलीवर ओरडायचा. कधी Market मधून वांगे आणले आणि आलू नाही आणले म्हणून भांडण व्हायचं तर कधी Market मधुन Fish आणलं Chicken नाही आणलं म्हणुन भांडण व्हायचं. कधी रवी अंजलीच्या Relative's मध्ये जात नाही म्हणून भांडण व्हायचं तर कधी अंजली रवीच्या Relative's चा मान ठेवत नाही म्हणून भांडण व्हायचं. रवी आणि अंजली ने ही सततची भांडणं होण्यामागची कारणं जाणून घेण्यासाठी मोठ्यांशी सल्लामसलत केलं परंतु त्यांनीही हेच सांगितलं की, “पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं होणं स्वाभाविक आहे. याबद्दल तुम्ही फार विचार करू नका हे तुमच्या दोघांमधलं प्रेम च आहे.” असं त्यांनी सांगितलं म्हणून दोघेही निवांत झाले परंतू त्यांच्या याच छोट्या मोठ्या भांडणाचा प्रभाव मात्र हळू हळू त्यांचा मुलगा राहुल वर व्हायला लागला याचा त्यांना जराही भान न्हवता. एक दिवस ये सर्व त्याच्या सहनशीलतेच्या बाहेर गेलं आणि त्याने स्वतःच्याच Room मध्ये Fan ला फाशी लावून आत्महत्या केली. आणि Sucide Note मध्ये लिहून ठेवलं, “आई-बाबांच्या सततच्या भांडणाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहो.”
मुलाचा Sucide Note वाचून दोघांचेही डोळे तर खुलले होते मात्र परिस्थिती अजूनही सुधारलेली न्हवती. त्या दोघांमधले होणारे सतत ची भांडणे आता वाढू लागली. परंतु मुलगा गेल्यामुळे दोघांनाही आया त्यांच्या एकटेपणा त्यांना छळू लागला होता. रवी office मध्ये काम करत असल्यामुळे का होईना त्याला फारसा फरक जाणवत न्हवता परंतु अजली मात्र घरात एकटी पडल्यामुळे तिला तिचा एकटेपणा अती छळू लागलेला होता. तिला घरात नेहमीच तिच्या मुलाच्या किंचाळ्या ऐकायला येत होत्या, तिच्या डोळ्यासमोर सारखा राहुल चा फाशी लागलेला चेहरादिसत होता. आणि तिनेही ऐक दिवस ज्या Fan ला राहुलने फाशी लावून आत्महत्या केली होती त्याच Fan ला अंजली ने देखील स्वतःला फाशी लावून आत्महत्या केली होती. आणि Suside Note वर तिने लिहून ठेवलं होतं की, “मी माझा मुलगा राहुल च्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.” आता मात्र रवी चा Office मध्ये देखील मन लागायचा नाही. त्याच्या डोळ्यासमोर सारखं अंजली आणि राहुल चा फाशी लागलेला चेहरा दिसत होता आणि कानावर दोघांच्याही किंचाळ्या ऐकायला यायच्या. त्याला घरात सुद्धा जावसं वाटत न्हवतं म्हणून त्यानेही एक दिवस Office मधल्याच एका Fan ला फाशी लावून आत्महत्या केली. आणि Suside मध्ये त्याने लिहून ठेवलं होतं की, “मी माझा मुलगा राहुल आणि माझी पत्नी अंजली या दोघांच्याही आत्महत्येला कारणीभूत आहे म्हणून मी आत्महत्या करतोय. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही दोषी ठरवू नये.” एका छोट्याशा भांडणामुळे घरातील तिघांनीही आत्महत्या केली आणि त्यांचं अख्खं आयुष्य संपलं.
रवी आणि अंजली यांची story वाचून तर तुम्हाला कळलंच असेल की एक छोटंसं ही भांडण कसं अख्ख्या परिवाराच्या आयुष्याची राख-रांगोळी करू शकते. आपला हा खूप गोड गैरसमज आहे की पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं ही त्यांच्यामधील असणाऱ्या प्रेमामुळे होतात. वास्तविकरीत्या पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं ही एकमेकांना समजून न घेतल्या मुळे होत असतात. कारण लग्न जुळवतांनी आपण सर्व बघतो मात्र कधीच हे बघत नाही की मुलगा मुलगी एकमेकांना समजून घेऊ शकतात की नाही. मी माझ्या मागील blog (A social gamble एक समाजमान्य जुगार: लग्न) यामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केलो की लग्न ठरवतांना मुलगा आणि मुलगी यांना हवा तेवढा वेळ द्या जेणे करून हे एकमेकांना समजू शकतील. कारण जर मुलगा मुलगी एकमेकांना समजू शकले नाहीत तर त्यांच्या मध्ये देखील रवी आणि अंजली सारखे भांडणं होतील आणि अख्ख्या परिवाराचं आयुष्य बरबाद होईल.
Conclusion:-
पती-पत्नी च्या नात्यामध्ये भांडणं होत असतील तर वेळीच सावध होणे गरजेचं आहे...कारण एक छोटंसं ही भांडण देखील विशाल रूप घेऊन अख्खं आयुष्य बरबाद करू शकते.
तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद
.jpeg)
खूप छान संदेश दडलेला आहे आपल्या ब्लॉग मध्ये.
ReplyDeleteखुप खुप आभार सर तुमचा
Delete