https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : अनमोल भेट

Followers

अनमोल भेट

 एक अनमोल भेट

प्रेम

            या जगातील माझ्यासाठी सर्वात प्रिय असणारे अर्थात माझे आई वडील यांना काय भेट देऊ याचा विचार करत मी वाटेने चिंता ग्रस्त होऊन चालत होतो. त्याच वाटेत मला एक सत्वपुरूष मिळाले त्यांना माझ्या कपाळावरील पडलेल्या रेघांना बघून हे कळायला फार उशीर लागला नाही की, मी कसल्यातरी चिंतेत आहों. त्यांनी मला त्याचं क्षणी थांबवून विचारलं, “कसल्या विचारात आहेस बेटा तू?” मी त्या सत्वपुरुषांना उत्तर दिलो, “बाबा, मला माझ्या आई वडिलांना एक अनमोल भेट द्यायची आहे. परंतु, मला हे कळत नाही की, या जगात अशी कुठली अनमोल भेट आहे.” त्यावेळी त्यांनी एक क्षण ही विचार न करता मला बोलले की, या जगातील अनमोल भेट तर कोहिनूर हिरा आहे, देऊ शकतोस तू.....? यावर मी त्यांना हसून च उत्तर दिलो, “अहो बाबा, कोहिनूर हिरा तर फार दूर राहिला साधा हिरा सुद्धा द्यायची लायकी नाही आहे. आजही मी त्यांच्या पैशांवर आयुष्य जगत आहो. मग मला सांगा बाबा, मी माझ्या आई वडिलांना तेवढी महागडी भेट कशी देऊ शकतो.” यावर ते सत्वपुरुष मला म्हणाले, “मग बेटा, तू अनमोल भेट द्यायचं विसरून जा. मोठा हो पैसे कमव मग दे त्यांना एक अनमोल भेट. कारण या जगात पैशा शिवाय काहीही होऊ शकत नाही.” मी हे ऐकताच थोडा नाराज होऊन त्यांच्या जवळून जाण्यासाठी निघालो, तेवढ्यात त्यांनी माझा हाथ धरला आणि म्हणाले, “बेटा थांब, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. मी म्हटलोय या जगात पैसा शिवाय काहीही होऊ शकत नाही, परंतु हे अर्धसत्य आहे.”

सत्वपुरूष

                 मी हे ऐकताच आश्चर्यचकित झालो आणि त्यांना विचारलो, “बाबा, हे पूर्ण सत्य नाही तर मग पूर्ण सत्य काय आहे....!” त्यावर ते बाबा मला सांगायला लागले, “पैसा शिवाय या जगात काहीही मिळत नाही, है जरी जगमान्य झालेलं असेल तरी देखील या जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या मिळवायला अरबो पैसा दिला तरी देखील मिळवू शकत नाही. फरक फक्त एवढंच आहे की, त्या गोष्टी आपल्याला सहजा सहजी दिसत नाहीत त्यासाठी आपल्याला आपला बघायचा दृष्टिकोन बदलावा लागेल.” त्यांना मी मध्येच थांबवून विचारलो, “ बाबा, मग हा आपला दृष्टीकोन कधी आणि कसा बदलेल?” त्यावर त्यांनी सांगितलं, “आपल्या डोळ्यांवर या जगाने एक अदृश्य चस्मा लावून ठेवलेला आहे त्यामुळे आपल्या ही तेच दिसते जे हे जग आपल्या दाखवण्याचा प्रयत्न करते. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायचा असेल तर सर्वात आधी तो अदृश्य चस्मा आपल्या डोळ्यांवरून काढावा लागेल किव्वा Tarak Mehta ka ooltah chashma या serial मध्ये दाखविल्या प्रमाणे आपल्याला ही आपल्या डोळ्यांवरील चस्मा उलटा करावा लागेल. तेव्हाच आपला दृष्टीकोन बदलेल तेव्हाच आपल्याला या खी जगमान्य असलेल्या वाक्यांचा सत्य कळेल. तू तुझ्या आई वडिलांना देऊ शकतेस अशी एक अनमोल भेट आहे ते देखील तुझ्या जवळच ज्या भेट साठी तुला एक रुपया ही द्यावा लागणार नाही. फरक फक्त एवढाच आहे की, तुला ती दिसत नाही आहे कारण तुझ्या डोळ्यांवर देखील या जगाने घालून दिलेला तो अदृश्य चस्मा आहे म्हणून ते अनमोल भेट तुला दिसत नाही आहे.”

Tmkoc

                     हे ऐकताच मी अती उत्साहित होऊन त्यांना विचारलो, “सांगा ना बाबा ती अनमोल भेट काय आहे जी मी आपल्या आई वडिलांना देऊ शकतोय ती देखील एक ही रुपया न देता.” “होय, नक्कीच सांगतोय परंतु त्याआधी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.” असं त्यांनी म्हणताच मी लगेच त्यांना विचारायला सांगितलो. तेव्हा त्यांनी मला विचारलं, “तुला तुझ्या आई-वडिलांना च हे अनमोल भेट का द्यायची आहे? त्यांचं असं प्रश्न ऐकताच मी एका क्षणाचा देखील विचार न करता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरवात केलो, “कारण बाबा, मी या जगात सर्वात जास्त प्रेम फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांनाच करतो त्यामुळे मला सर्वात आधी त्यांनाच हे अनमोल भेट द्यायची आहे. त्यावर ते बोलले, “मग तू नकोच देऊ ते अनमोल भेट” असं म्हणताच की आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलो, “का? का बरं मी माझ्या आई वडिलांना अनमोल भेट नाही द्यायची?” त्यावर त्यांनी मला म्हटलं, कारण बेटा या जगातली सर्वात अनमोल भेट तर त्यांना देत च आहेस मग आणखी काय देणार?” मी परत आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलो, “मी कुठली त्यांना अनमोल भेट देलोय....!” त्यावर ते म्हणाले, “बेटा, या जगातील सर्वात अनमोल भेट हे प्रेम आहे आणि हे प्रेम अरबो पैसे देऊन सुद्धा विकत घेता येत नाही कारण ती एक अनमोल भेट आहे.” असं म्हणून त्यांनी परत मला म्हटलं, “तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर मी निघू काय? कारण मला अजून खूप दूर जायचं आहे.” असं त्यांनी म्हणताच मी होकारार्थी मान हलवून त्यांना प्रमाण केलो. ते ही मला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले.


                                          मी आज पर्यंत तर हेच ऐकत आलो होतो की, या जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम आहे पण आज कळलं या जगातील अनमोल भेट देखील प्रेम च आहे. वाटेत मिळालेल्या त्या सत्वपुरुषांनी म्हटलं ते योग्यच म्हटलं, पैशांनी प्रेम कधीच विकत घेता येत नाही. आणि मग शेवटी आपल्या आई वडिलांची सुद्धा आपल्याकडून कुठली महागडी वस्तू भेट द्यावी ही अपेक्षा मुळीच नसते तर त्यांना आपल्या कडून हवं असते ते फक्त आणि फक्त प्रेमाचे दोन शब्द तेवढं जर आपण त्यांना दिलं तर दुसऱ्या महागड्या भेट द्यायची मुळीच गरज पडत नाही. पण हल्ली परिस्थिती जरा वेगळी दिसत आहे. हल्लीची मुलं फक्त दिखाव्या साठी आई वडिलांना महागड्या भेटी देतात आणि जेव्हा त्यांना खरच त्यांच्या आधाराची गरज असते तेव्हा त्यांना लाथ मारून बाहेर हाकलून देतात. माझं सर्व मित्रांना हेच सांगणं आहे की, आपल्या आई वडिलांना तुम्ही महागड्या भेट वस्तू नाही देऊ शकले तरी हरकत नाही फक्त प्रेमाचे दोन शब्द रोज बोलत जा म्हणजे झालं. कारण या जगातील सर्वात अनमोल भेट जर कुठली असेल तर ते प्रेम आहे. हे प्रेम मिळविण्यासाठी कित्येक लोकं रडतात. लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा प्रेम विकत घेता येत नाही. अनमोल भेट कुठली असेल तर ते प्रेम आहे हिरे मोती नाही.


Conclusion:- 

                     पैश्या शिवाय काहीही होऊ शकत नाही असं सर्रास आपल्याला ऐकायला मिळत असेल पण हे वाक्य पूर्णतः चुकीचे आहे. पैशाने माणूस कधी आनंदी राहू शकत नाही. जीवनात जर आयुष्य आनंदमय पद्धतीने जगायचं असेल तर पैसा नाही दोन प्रेम करणारी माणसे हवीत......ती माणसे कधीच पैशाने विकत घेता येत नाही ते कमवावे लागतात....म्हणून तुमच्या आई-वडिलांना कधी महागडी भेट देऊ शकले नाही तर हरकत नाही पण रोज प्रेमाचे दोन शब्द बोलत चला तेच त्यांच्या साठी अनमोल भेट ठरेल कारण ती करोडो अरबो पैसे देऊन ही विकत घेता येत नाही.... 


आशु छाया प्रमोद

https://t.me/Chocholateboy5402

No comments:

Post a Comment