https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : Mahan Guru

Followers

Mahan Guru

 प्रथम गुरू कोण? 


                      आपल्या आयुष्यात एक तरी गुरू असणे फार गरजेचं आहे. कारण एक गुरू हा नेहमी आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीची जाणीव करून देत असतो. यशाच्या शिखरावर पोहोचवायला तो योग्य वळण आपल्याला दाखवीत असतो. “गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञान विना आत्मा नाही” असं म्हणतात ते योग्यच आहे.कारण आपण गुरू विना यश कधीच प्राप्त करू शकत नाही. पण तुम्हा सर्वांना आता एक प्रश्न पडला असेल ना की, आपल्या आयुष्यातील प्रथम गुरू कोण? आणि त्यांनाच गुरू च्या प्रथम स्थानी ठेवण्याचं कारण काय? तुम्हा सर्वांना जर या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ही Blog Post शेवट पर्यंत नक्की वाचा....तुम्हाला मी या पोस्ट मध्ये याचं सविस्तर उत्तर सांगेन. 
                            मी इयत्ता पाचवी मध्ये असतांना मला माझ्या शाळेतील एका शिक्षकांनी प्रश्न विचारलं होतं की, आशु तुझ्या आयुष्यातील तुझा प्रथम गुरू कोण आहेत? तेव्हा मला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. गुरू काय आहे? गुरू कोण आहेत? आपल्या आयुष्यात गुरू चं स्थान काय आहे? अशा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्यावेळी माझ्याकडे न्हवते. पण माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की, माझे प्रथम गुरू हे माझे आई वडील आहेत. आणि माझेच नाही तर या जगातील प्रत्येक व्यक्तीचे प्रथम गुरू हे त्यांचे आई वडील च असतात. मी लगेच त्या शिक्षकांना प्रश्न विचारलो की, सर आई वडील च आपले प्रथम गुरू का? तर त्यांनी मला उत्तर दिलं होतं की, कारण आपल्याला त्यांनी जन्म दिलं, त्यांच्यामुळेच आपण हे सारं जग बघतोय त्यामुळे आपले प्रथम गुरू आई वडील आहेत. सरांचं है उत्तर ऐकून मी त्यावेळी तर नक्कीच समाधानी झालो होतो परंतु आज मी त्या उत्तराने परिपूर्ण समाधानी नाही आहो. कारण, मला वाटते की ते उत्तर परिपूर्ण नाही तर अर्धवट उत्तर आहे. मी त्या शिक्षकांना चुकीचं समजत नाही आहे कारण मला वाटते की, त्यांनी ही मला समजेल या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला असेल त्यामुळे त्यांनी कदाचित मला अर्धवट उत्तर सांगितलेलं असेल कारण त्यावेळी माझी वय लहान होती आणि त्यामुळे मला फारशी जाणीव न्हवती. पण जसं जसं माझं वय वाढलं तसं तसं मला कळायला लागलं की आपले प्रथम गुरू कोण आहेत? आणि आपण त्यांनाच गुरू च्या प्रथम स्थानी का ठेवतो? या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर मी अनुभवलेल्या माझ्या काही गोष्टींवरून सांगण्याचा प्रयत्न करतोय.
Aai Baba
                                    माझे वडील आणि माझी आई दोन्ही ही १० वी नापास आहेत. परंतु याची मला मुळीच लाज नाही तर मला गर्व आहे. कारण, त्यांनी जे काही मला शिकवलं आहे ना ते या जगातील कुठलीच शाळा, कुठलीच University किव्वा कुठलेच Teacher शिकवू शकले नाहीत आणि आयुष्यात कधीच शिकवू शकणार ही नाही. मला माझ्या आई वडिलांनी नाही फक्त जन्म दिलं, नाही फक्त मला हे जग दाखवलं तर या जगात जगणं त्यांनी मला शिकवलं. पडल्यानंतर स्वतः कुणाच्याही आधारा विना उभं राहायला शिकवलं, योग्य वळणावर चालायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझ्या पंखांना बळ देऊन उंच भरारी मरायला शिकवलं. स्पर्धेत टिकून राहायला शिकवलं कारण माझ्या आई वडिलांना वाटतं की, माझ्या मुलाने यशाचं शिखर गाठावं....मी नेहमी च ऐकत आलोय की, पैशाशिवाय जा जगात काहीही करू शकत नाही पण खिशात पैसा नसतांना देखील समाजसेवा कशी करायची ते मी माझ्या वडिलांकडून शिकलो, राजकारण कसं करायचं ते ही मी माझ्या वडिलांकडून शिकलो आणि घरातील एका पोळी मधून निम्मी पोळी खाऊन निम्मं उपाशी राहून भुकेलेल्याचं पोट कसं भरायचं ते मी माझ्या आई कडून शिकलो, पैशांची काटकसर कशी करायची ते देखील मी माझ्या आई कडून शिकलो. म्हणून च मी माझ्या आई वडिलांना कायम गुरूच्या प्रथम स्थानी ठेवतो.
                         आता तुम्हाला वाटत असेल की, हे तर मी फक्त माझ्या आई वडिलांबद्दल बोलतोय. तर याचं उत्तर “नाही” असं आहे कारण, या जगातील कुठलेही आई वडील असोत मग ते पदवीधर असोत किव्वा मग त्यांनी शाळेतील पायरी सुद्धा कधी ओलांडली नसेल तरी देखील ते आई वडील आपल्या मुलांसाठी प्रथम गुरू आहेत. कारण त्यांनी नाही फक्त मुलांना जन्म दिलं, नाही फक्त त्यांना हे जग दाखवलं तर या जगात जगायला शिकवलं, योग्य वळणावर चालायला शिकवलं, स्पर्धेत टिकून राहायला शिकवलं. मुलांच्या पंखांना बळ देऊन उंच भरारी मारायला शिकवलं कारण या जगातील प्रत्येक च आई वडिलांना वाटते की, त्यांच्या मुलांनी यशाचं शिखर गाठावं..मग ते शिक्षित असोत वा अशिक्षित असोत. आई वडील मुलांना जे शिकवतात ते या जगातील कुणीही शिकवू शकत नाही मग ते कितीही महान असले तर आई वडिलांची कमी पूर्ण करून देऊ शकत नाही. त्यांच्या सारखं शिकवू शकत नाही म्हणून मी नेहमीच म्हणतोय की, आई वडील हेच आपल्या आयुष्यातील प्रथम गुरू आहेत.        
         

Conclusion:- 

                      मला या Blog Post मधून हेच सांगायचं होतं की, आई वडील हेच आपले प्रथम गुरू असतात. कारण, ते जे शिकवतात ते या जगातील कुठलीच University असो वा कुठलाच Teacher असो शिकवू शकत नाही. तराजू च्या एका पारड्यात जगातील सर्व गुरू ठेवा आणि एका पारड्यात फक्त आई वडिलांना ठेवा आणि बघा आई वडिलांचाच पारडा भारी असेल.....
Happy Marriage Anniversary mammi papa
             आज ही पोस्ट लिहिण्याचा कारण की, आज माझ्या गुरूंचा अर्थात माझ्या आई वडिलांची Marriage Anniversary आहे. मला ही त्यांच्या साठी काहीतरी भेट द्यायची होती पण काय देऊ त्यांना भेट हाच मला प्रश्न पडला होता कारण आज जे काही आहे माझ्याकडे ते सर्वस्व त्यांचंच आहे. आज मला एक रुपयाचं चॉकलेट घ्यायला सुद्धा मला त्यांनाच पैसे मागावे लागतात तर मी त्यांना काय भेट देऊ शकतो. मी त्यांनी काही अनमोल भेट देऊ शकत नाही पण एक मात्र नक्की की, त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
Happy Marriage Anniversary मम्मी पप्पा
तुमचाच
आशु छाया प्रमोद

टिपः छाया हे नाव माझ्या आई चे आहे आणि प्रमोद हे नाव माझ्या वडिलांचं आहे. मी नेहमी आपल्या नावासोबत आई वडिल दोघांचं नाव लिहितो कारण माझ्या नावावर दोघांचाही समान हक्क आहे म्हणून.......

No comments:

Post a Comment