रांड
आज मी एका अशा विषयावर लिहीत आहों जे वाचून कदाचित काही मुलांना माझा राग येईल. काही मुलं मला शिव्या पण देतील. पण मी लिहिणार कारण ते सत्य आहे. मी मुलगा झालो म्हणून काय झालं जे चुकीचं आहे त्याला माझा कायम विरोध राहील मग समोर कुणीही असो. एखादी मुलगी आपल्यासोबत relation मध्ये असेल आपल्यासोबत physical झाली असेल आणि नंतर ब्रेकअप झालं असेल. तीच मुलगी जर कधी दुसऱ्या कुठल्या bf ला date करतांनी दिसली की आपण तिला सर्रास रांड म्हणतो. ठिक आहे जर ती तुमच्या दृष्टीने रांड असेल तर ठीक आहे ना पण ती तुमची gf असायच्या आधी तुमच्या 3-4 gf होत्या त्यांचं काय? किव्वा तिच्या सोबत relation सुरू असतांना सुद्धा तू दुसऱ्या मुली सोबत physical झाला त्याचं काय? किव्वा ती सोडून गेल्यानंतर तू सुद्धा दुसरी मुलगी बघितलासच त्याचं काय? तिने दुसरा bf बनवला म्हणून जर ती रांड झाली तर तुझ्या तर कित्येक gf झाल्यात मग तुला काय म्हणायचं?
मी तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगतो तिचं नाव मी सांगत नाही पण ती माझी सिनियर होती. तिला सर्वच मुलं रांड म्हणत होते. म्हणून मी सहज एका मुलाला विचारलो की, या मुलीला रांड का म्हणतात? तर त्याने मला सांगितलं की, ही या मुलीचे खूप bf झालेत आणि ही मुलगी नेहमी BF बदलत असते. त्या मुलीच्या गावचे माझे खूप मित्र मैत्रीण होते त्यांच्या साहाय्याने मी तिची माहिती जाणून घेतलो आणि हे सर्व ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला....! कारण एवढी साधी सरळ मुलगी आज प्रत्येक मुलाच्या नजरेत रांड कशी ठरली? असा मला प्रश्न पडू लागला. मी हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी as a ज्युनियर स्टूडेंट म्हणून contact वाढवलो आणि तिच्याशी एकदिवस मैत्री केलो. तेव्हा तिच्याकडून च मला तिचा पहिला bf कोण होता हे कळलं आणि योगानुयोग च जणू तिचा पहिला bf माझ्या च जवळचा व्यक्ती होता. मी तिला नंतर याबद्दल म्हटलो की, हे तू चुकीचं करत आहे हे लवकरात लवकर थांबव. आणि तिच्या त्या पहिल्या bf ला पण त्यांच्या relation बद्दल विचारलो तेव्हा मला कळलं की तिचं प्रॉब्लेम काय आहे.
तिच्या पहिल्या bf ने तिच्याशी फक्त Physical होण्यासाठी प्रपोज केलं आणि ते नंतर थोड्याच दिवसाने Physical सुद्धा झाले एकदा नाही तर अनेकदा physical झाले. आणि हेच नेहमी नेहमी physical झाल्यामुळे तिला सवय झाली पण काही दिवसांनी हे प्रकरण त्या मुलीच्या घरी कळलं आणि त्याचं relation break झालं. नंतर तिला दुसरा bf मिळाला त्यानेही फक्त Physical होण्यासाठी relation ठेवलं आणि काही दिवसाने ब्रेकअप केलं असेच तिला bf भेटत गेले त्यामुळे तिला जणू ही सवय च झाली. bf बनवायचं त्याच्याशी physical व्हायचं आणि 1-2 महिन्याने ब्रेकअप करायचं. आता मला सांगा ती तर एक साधी सरळ मुलगी होती मग ति रांड कशामुळे झाली? जर ती 10 bf बदलवत असेल आणि मुलांशी physical होत असेल तर मुलांच्याही कित्येक gf असतातच आणि तेही ही कित्येक मुलींशी physical होतात त्यामुळें तिला रांड म्हणायचा तुमचा अधिकार नाही. मी असं म्हणत नाही की प्रेमात Physical होऊ नका. पण Physically Attract होऊन physical होऊ नका.
एखादी व्यक्ती आपल्या पार्टनर सोबत Physically Attraction द्वारे जर phycical होत असेल तर त्यांच्या मधलं प्रेम कमी होत जाते. सरळ भाषेत सांगायचं झालं तर नेहमी नेहमी एकाच पार्टनर सोबत Physical होऊन ते बोअर होतात. हे मी नाही म्हणत तर it's a psychological fact. त्यामुळे हल्ली तरुण किव्वा तरुणींचं bf/gf बदलणं हे स्वाभाविक आहे. मला मान्य आहे हे चुकीचं आहे पण याचं कारण ही आपला समाज आहे जो कधी sex बद्दल मनमोकळे पणाने बोललं जात नाही. आणि आपण मुले सुद्धा कधी मोठ्यांना विचारत नाहीत. आपण आपल्या मित्र वा मैत्रिणींना विचारतो त्यांना असलेलं अर्धवट ज्ञान ते तुम्हाला सांगतात. आणि अर्धवट ज्ञान नेहमीच घातक ठरते. आणि आपण अशा चुका करून बसतो ज्या खरच चुका आहेत तुमचा मनोरंजन हे ही तुम्हाला कळत नाही तुम्ही फक्त मनोरंजन म्हणून करता. मी पुन्हा सांगतो physical होणं चुकीचं नाही फक्त तुमची पद्धत चुकीची आहे त्याबद्दल जाणून घ्या sex बद्दल पूर्ण जाणून घ्या. शक्यतो मोठ्यांना विचारा. पण अर्धवट ज्ञान असणाऱ्या किव्वा अशा मित्रांना किव्वा मैत्रिणींना विचारू नका जे फक्त मनोरंजन म्हणून sex करतात. Sex education is most important in our life.
माझं पुन्हा एकदा मुलांना सांगणं आहे की अशा मुलींना कृपया रांड म्हणून त्यांची बदनामी करू नका तुमच्याही घरी आई आहे बहीण आहे याचा भान असूद्या. तुमच्या बहिणीला सुद्धा मी रांड म्हटलो किव्वा एक रात्र झोपायला माझ्या घरी पाठवा म्हटलो तर मग तुम्हाला ही राग यायला नको पाहिजे याचाही विचार करून ठेवा. ती जर रांड असेल तर तिला रांड बनवणारे तुम्हीही काही तिच्यापेक्षा कमी नाही. माझ्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी मुळीच माफी मागणार नाही कारण मी यात चुकीचं काहीही लिहिलो नाही. जर काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा मी ही काही मोठा नाही. तुमच्याच वयातील मुलगा आहों.
धन्यवाद.....!
तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद(रावण)
No comments:
Post a Comment