लेखकाचा वाचक आणि वाचनाशी संबंध...
तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? एका लेखकाचा वाचन आणि वाचक यांच्याशी थेट संबंध असतो. कारण एक लेखक हा वाचनाशिवाय कधीच लिहू शकत नाही आणि वाचकाशिवाय लेखकांच्या लिखाणाला कधीच अर्थ लागणार नाही. म्हणुन मला वयक्तिकरित्या असं वाटते की, लेखकाने वाचन आणि वाचकांना कधीच विसरू नये. कारण वाचकांमुळे फक्त लेखकाच्या लेखनाला अर्थ च लागत नाही तर त्यांच्या प्रत्येक्ष किव्वा अप्रत्यक्ष प्रतिक्रियांमुळे लेखकाला प्रेरणा देखील मिळत असते. आज मी अशाच एका वाचक बद्दल लिहीत आहों ज्या स्वतः सुद्धा एक उत्तम लेखिका/कवीयित्री आहेत. माझ्यापेक्षा त्या कदाचीत 1 ते 2 वर्षाने जरी लहान असतील मात्र विचारांनी माझ्यापेक्षा देखील फार मोठ्या आहेत असं मला वाटते. त्यांचं नाव “वैष्णवी संतोष खलसे” असं आहे. त्यांचा मी फार फार आभारी आहो. कारण त्यांनी माझ्या प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देऊन मला वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्यासाठी एक प्रकारे प्रेरीतच केलं आहे. त्यामुळे आजचा हा लेख त्यांनीच विचारलेल्या एका प्रश्नावर आहे.
![]() |
| त्यांचा आवडला कॅरेक्टर मोटू |
मी वर सांगितल्या प्रमाणे फार मोठा लेखक नाही परंतू मी माझ्या परीने उत्तर देण्याचं प्रयत्न केलो. एक लेखक म्हणून माझ्या वाचकांप्रती ही माझी जबाबदारी आहे की, मी माझ्या वाचकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तसेच मी माझ्या सर्व वाचकांना हे सांगतोय की, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटते किव्वा मला जे काही विचारावं वाटते ते नक्की विचारा. मी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. परत एकदा मी “वैष्णवी संतोष खलसे” तसेच इतर वाचकांचा फार फार आभारी आहो कारण तुम्हीच मला एवढं मोठं केलं आहे.
धन्यवाद...
तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद(रावण)
7820994148
.jpeg)
छान... लेखन मुळात आपल्याला ज्ञान देण्याचे काम करते... लेखन आणि वाचन दोन्ही व्यक्तींच्या मानसिक विकासासाठी महत्वपूर्ण आहे.
ReplyDeleteअगदीं बरोबर आहे Madam thanku very much
Delete