जुगार
![]() |
| Jugar |
मुलगी 21 वर्षाची झाली आणि मुलाला नोकरी मिळाली किव्वा तो थोडाफार कमवायला लागला की त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट आपोआप Add होऊन जाते ती म्हणजे लग्न....! मुलगा नोकरी ला किव्वा काही थोडे फार पैसे कमवायला लागेपर्यंत त्यांचे आई वडील थकायला लागतात त्यांच्यासाठी घरी हाथभार लावायला कुणीतरी सोबत हवी म्हणून मुलगा कमवायला लागल्यावर लग्न करणे साहजिकच आहे यात काही शंका नाही. तसेच मुलगी ही कधीच आपल्या आई वडिलांना बोझ राहत नाही परंतु तिला वयात आल्या नंतर घरात एकटं ठेवणं बरं दिसत नाही म्हणून तिचाही लग्न करणे साहजिकच आहे. परंतु सध्याची परिस्थिती बघता हे लग्न नाही तर एक समाजमान्य जुगार च आहे. हे वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. लग्न हा एक समाजमान्य जुगार आहे.....! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी पवित्र अशा लग्नाला जुगाराचं नाव का देतोय? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ही मी देतोय.....
एक समाजमान्य जुगार: लग्न
![]() |
| Marriage |
जुगार खेळणाऱ्याला नशीबाने साथ दिली तर रस्त्यावर राहणारा देखील मोठा बंगला बनवू शकतो आणि जर का जुगार खेळणाऱ्या व्यक्तीला नशीबाने साथ दिली नाही तर एका बंगल्यात राहणारा देखील रस्त्यावर येतो. अगदी तसच लग्नाचं ही झालं आहे. Partner योग्य मिळाला तर एका झोपडी मध्ये देखील स्वर्ग असल्यासारखं वाटेल आणि जर का Patrner योग्य मिळाला नाही तर मोठ्या बंगल्या मध्ये सुद्धा नरक यातना सहन कराव्या लागतील. पण हे तर नशीबावर अवलंबून आहे यात आपण माणसे काय करू शकतो? यात आई वडिलांची कुठं चुकी आहे? असं तुम्हाला वाटत असेल. तर होय तुमचं म्हणणं अगदी खरं आहे हे नशीबावर अवलंबून आहे. पण जर का आपण लग्न ठरविण्याच्या पद्धतीवर अगदी बारकाईने लक्ष दिलं तर कळेल की मी लग्नाला जुगार का म्हटलोय...
अख्खं आयुष्य जातं एका माणसाला ओळखण्यात आणि हे 1 तासाच्या Meeting मध्ये ठरवतात की लग्नासाठी मुलगा/मुलगी योग्य आहे की नाही. कित्येकदा तर मुलीला विचारलं देखील जात नाही की तिला तो मुलगा आवडतो की नाही. अरे आयुष्यभर त्या मुलीला राहायचं आहे ना त्या मुलासोबत मग एकदा तिला विचारा ना.....माझ्याच वर्गातील एका मुलीचा लग्न तिच्या वडिलांनी तिच्याच आत्याच्या मुला सोबत ठरवलं...का तर म्हणे मुलगा चांगला नौकरी वर आहे. अरे लग्न त्या मुलासोबत लावायचं आहे की त्याच्या नौकरी सोबत...त्या मुलीच्या डोळ्यात च दिसते की तिला तो मुलगा मुळीच आवडत नाही हे तिच्या वडिलांना दिसत नसेल का? दिसत ही असेल कदाचित पण प्रत्येक आई वडिलांना जसा विश्वास आहे की ते त्यांच्या मुलांचं/मुलींचं वाईट होऊ देणार नाही अगदी तसाच तिच्याही वडिलांना विश्वास आहे पण हा विश्वास जरा अती होत चाललाय...आणि ते म्हणतात ना “अती तिथं माती” तसाच हा अती विश्वास देखील मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे. मुलगा चांगला दिसला की मुलीचं लग्न ठरवून टाकतात आणि मुलगी चांगली दिसली की मुलाचं ही लग्न ठरवून टाकतात त्या 1 तासाच्या Meeting मध्ये आणि मग नंतर 1 महिन्यात साखरपुडा आणि दोन महिन्यात लग्न करतात....मग त्यांच्या मध्ये पटलं नाही किव्वा काही वर्षाने तलाक झालं तर नशीबाला दोष देऊन मोकळे होतात. मला आता सांगा यात नशीबाचा काय दोष? आपण एक साधा Shirt देखील घेण्यासाठी जेव्हा shop मध्ये जातो तेव्हा कित्ती वेळ विचार करतो... Shirt हा Jeans वर शोभेल का? त्यांचा रंग आपल्यावर शूट होईल का? shirt ची Quality कशी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो Shirt आपल्या Budget मध्ये बसेल का? एवढा विचार करतो तो फक्त एक Shirt घेण्यासाठी मग हा तर आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथे विचार करायला नको.. 1 तासाच्या Meeting मध्ये Partner दिसायला चांगलं वाटलं किव्वा चांगली नोकरी आहे तर लग्न लावून द्यायचं. मग हा जुगार नाही तर काय आहे? Partner योग्य मिळाला तर एका झोपडीचं देखील स्वर्ग होईल आणि जर का Patrner योग्य मिळाला नाही तर मोठ्या बंगल्याचं देखील नर्क व्हायला उशीर लागणार नाही...
Conclusion:-
माझा लग्नाला मुळीच विरोध नाही. मला हे देखील मान्य आहे की, आई वडील कधीच मुलांचं वाईट सोचनार नाही पण तो आधी सारखा जमाना आता राहिलेला नाही. इथे लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. लग्न हा त्या मुला-मुलीचा आयुष्यभऱ्याचा प्रश्न असतो त्यासाठी ती 1 तासाची Meeting पुरेशी नाही आहे. त्या मुला-मुलीला हवा तेवढा वेळ घेऊ द्या, त्यांना एकमेकांना समजून घेऊ द्या आणि नंतर च लग्न ठरवा. कारण हल्ली कित्येक लग्न तुटून राहिलेत त्याचा सर्वात महत्वाचा कारण म्हणजे एकमेकांना समजून न घेणे हाच आहे.
Important Note:-
मी इथे Arrange Marriage बद्दल Problem Share केलो याचा अर्थ असं नाही की माझा Love Marriage ला पूर्ण समर्थन असेल. मुलं-मुली लग्नाच्या वयात आले म्हणजे असं नाही की ते त्यांचा Life Partner स्वतः निवडू शकतात. तुम्हाला Love Marriage करायचं असेल तर करा पण आई वडील किव्वा मोठ्यांच्या सल्ला घेऊन च समोरचं योग्य तो Decision घ्या..शेवटी लग्न हा आयुष्यभऱ्याचा प्रश्न आहे......
तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद
.jpeg)
.jpeg)
👌👌👌👌अगदीच मनाला पटेल असा लेख आहे sir... अगदी सुंदर विचार....आजच्या या धावपळीच्या दुनियेत हा समाजमान्य जुगार विचार करून सुध्धा विचार न केल्या सारखा खेळला जातो याची खंत वाटते..
ReplyDeleteहोय मॅडम माझा हे लेख लिहिण्याचा हाच उद्देश आहे की लोकांनी लग्न ठरवतांना विचार करावा मुला मुलींना वेळ द्यावा नंतर च ठरवावं....तुमचा खूप खूप आभार प्रतिक्रिया कळविल्याबद्दल
Delete🙏🙂
Deleteअतिशय योग्य पध्दतीने लग्न करताना घ्यावयाची काळजी विश्लेषण करून सांगणारा हा लेख आहे.
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद तुमचा प्रतिक्रिया कळविल्याबद्दल
Delete