नवरात्री
हिंदू धर्मात देवी भागवत पुराणानुसार वर्षभरात मुख्यतः चार नवरात्री असतात ज्यात दोन गुप्त नवरात्री ज्या तांत्रिक शुद्धीकरणासाठी साजऱ्या केल्या जातात आणि दोन चैत्र नवरात्री ज्या मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरणासाठी साजऱ्या केल्या जातात. आता चैत्र नवरात्री मध्ये एक वासंतिक नवरात्र असते जी चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत असते म्हणजे साधारणतः मार्च ते एप्रिल मध्ये असते. आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री जी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते म्हणजे साधारणतः ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये साजरी केली जाते. तर आता आज पासून शारदीय नवरात्र सुरू झाल्यामुळे मी आज तुम्हाला शारदीय नवरात्र बद्दल सांगतोय.
शारदीय नवरात्र:-
शारदीय नवरात्र ला शाक्तपंथीय मानले जाते. ही शरद ऋतूच्या सुरवातीला येत असल्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात. या काळात घट स्थापन करून नव दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते म्हणूनच या शारदीय नवरात्री ला घटस्थापना किव्वा नवरात्रोत्सव असे देखील म्हणतात. या दुर्गा देवीचे नऊ रूप सौम्य आणि उग्र अशा दोन रुपात वर्गीकरण केलेली आहे. सौम्य रुपात उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी तर उग्र रूपात काली, चंडी, भैरवी, चामुंडा अशी आहेत.
प्रथमंशैलपुत्रीति, द्वितीयंब्रह्मचारिणी ।
तृतीयंचन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम्।।
पंचमंस्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमंकालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम्।।
नवमं सिद्धिदांप्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
अर्थात प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चतुर्थ कुष्मांडी, पंचमी स्कंदमाता, षष्टी कात्यायनी, सप्तमी कालरात्री, अष्टमी महागौरी आणि शेवटी नवमी सिद्धिदात्री अशी मुख्य दुर्गा देवीचे नऊ रूप आहेत. या नऊ रात्रीच्या नऊ दिवशी स्त्रिया वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या घालून नऊ देवींच्या रुपाची आराधना करतात जसं की 2022 च्या तारीख आणि वार नुसार पहिल्या दिवशी पांढरी, दुसऱ्या दिवशी लाल, तिसऱ्या दिवशी निळी, चौथ्या दिवशी पिवळी, पाचव्या दिवशी हिरवी, सहाव्या दिवशी ग्रे, सातच्या दिवशी भगवी, आठव्या दिवशी मोरपंखी आणि शेवटच्या म्हणजेच नवव्या दिवशी गुलाबी रंगाची साडी घालून नवरात्री साजरी केली जाते ही पेशवाई पद्धत आहे.
पौराणिक कथा नुसार अशी मान्यता आहे की, एका महिषासुर नावाच्या दैत्याने अनेक वरदान घेऊन देवतांना छळत होता त्यामुळे सर्व देवता शिव, विष्णू आणि ब्रम्हा कडे आले आणि त्यांनी एका देवी ला प्रकट करून तिला शस्त्र-अस्त्र देऊन तिला महिषासुर चा वध करायला पाठविले. हा युद्ध नऊ दिवस चालला होता आणि शेवटी दहाव्या दिवशी महिषासुर चा त्या देवीने वध केलं. या संबधित अशी देखील मान्यता आहे की, सर्व देवतांनी नऊ दिवस त्या देवीची आराधना करून तिला शक्ती प्रदान केली. त्या नऊ दिवसांना स्मरणात ठेवण्यासाठी नऊ दिवसाची नवरात्री साजरी केली जाते. परंतू या सर्व मान्यता आहेत ज्यांचा आधार पौराणिक कथा आहेत. ज्याच्यावर काही लोकांचा विश्वास आहे तर काहींना या सर्व अंधश्रद्धा वाटतात. मात्र हा ज्यांच्या त्यांच्या वयक्तिक विषय आहे यात माझा मुलीच विरोध नाही. ज्यांचा विश्वास आहे ते मानतात ज्यांचा विश्वास नाही ते मानत नाहीत. या नवरात्रीचा चा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे..
वैज्ञानिक दृष्टिकोन:-
आपले आधीचे पूर्वज ऋतू नुसार सणवार साजरे करायचे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सण मध्ये काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन असायचा. नवरात्री ही साधारणतः ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये येत असते ज्यात संक्रमक रोग होण्याची दाट शक्यता असते तसेच ऋतू मध्ये बदल झाल्यामुळे आपल्या शरीरामधील रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत असते. त्यामुळे सात्विक भोजण केलं पाहिजे. ज्याने त्याचा पाचन तंत्र सुधारतो आणि शरीरातील अशुद्धी साफ करते. तसेच नऊ दिवस व्रत, उपासना, ध्यान केल्याने मनाची शांती सुद्धा मिळते. Times of India च्या report नुसार खाद्य पदार्थ चा प्रकृती वर होणाऱ्या परिणाम नुसार त्यांनी खाद्य पदार्थांना राजसिक भोजन, तामसिक भोजन आणि सात्विक भोजन मध्ये विभाजित केलं. राजसिक व तामसिक भोजन हा प्रकृती साठी हानिकारक ठरतो आणि सात्विक भोजन केल्याने पाचन तंत्र सुधारतो आणि शरीरातील अशुद्धी साफ होते. म्हणुन नवरात्री मध्ये व्रत उपासना ध्यान करून सात्विक भोजन केलं पाहिजे ज्याने या काळात होणारे संक्रमिक रोग आपल्याला होणार नाही...
या मागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे याच काळात स्त्रियांनी शेतीचा शोध लावला त्याविषयी स्त्रियांचा आदर सत्कार म्हणून देखील हा नवरात्री चा उत्सव साजरा केला जातो. चला तर मग अंधश्रद्धा विसरून हा सण साजरा करूया....
conclusion:-
मी या लेख द्वारे तुम्हाला नवरात्र चे धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलो. कारण कित्येक लोकं याला अंधश्रद्धा समजून कानाडोळा करतात व काहीही खातात मात्र या काळात काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावला त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे हाच माझा उद्देश आहे. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..
धन्यवाद....
तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)