https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : loksattanews

Followers

Showing posts with label loksattanews. Show all posts
Showing posts with label loksattanews. Show all posts

Alcoholic Addiction

 कोवळ्या वयात दारूचं व्यसन : ही धोक्याची घंटा

                        मी काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राच्या घरी सहज भेटायला म्हणून गेलो होतो. काही करणास्तव तो मला घरी मिळाला नाही परंतु त्याची आई मिळाली. मी त्याच्या आई सोबत बोलायला गेलो तर त्याची आई मला रडतांना दिसली. म्हणून मी त्यांना रडण्याचं कारण विचारलं तर त्या काकूंनी मला सांगितलं की, बेटा माझा मुलगा (माझा मित्र) हल्ली खूप दारू प्यायला लागला आहे. मी काकूंना समजावलो आणि त्या शांत झाल्या. मग काकूंनी मला त्याच्या रूम मध्ये बस म्हटलं म्हणून मी मित्राची वाट बघत बसलो. मला कधीच वाटलं नव्हतं की, हा माझा मित्र एवढ्या लवकर दारू च्या विळख्यात पडेल. तसा तर तो कॉलेज इव्हेंट मध्ये मित्रांसोबत कधी कधी बियर प्यायचा. तर कधी मित्रांच्या वाढदिवसामध्ये घ्यायचा पण दारू चं व्यसन त्याला एवढं लवकर लागेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. असा विचार करत होतो तेवढ्यात माझा मित्र आला. आम्ही थोडा वेळ बोललो, त्याला थोडं समजावलो परंतु मला वाटलं नाही की त्याच्या डोक्यात काही गेलं असेल कारण ते म्हणतात ना ज्या व्यक्तीला एकदा दारू चं व्यसन लागलं तर ते सहजासहजी सुटत नाही. अगदी तसच मलाही वाटलं म्हणून मी माझ्या मित्राची रजा घेत घरी परत यायला तिथून निघून गेलो.
                     मी घरी तर पोहोचलो परंतु मला घरी याच प्रश्नाचं उत्तर मिळत न्हवतं की, एवढ्याशा लहान वयात तो दारू च्या विळख्यात अडकला कसा? कारण त्याची वय देखील फारशी न्हवतीच...! तो माझा मित्र फक्त इयत्ता ९ वी चा विद्यार्थी होता आणि तो माझ्याच कॉलेज मध्ये शिकत होता. एकदा कॉलेज मध्ये आम्ही भेटलो एक-मेकांचे विचार पटले आणि लगेच मैत्री झाली. खरं सांगायचं झालं तर त्याच्या या परिस्थिती चा कारण मी देखील आहों. तो माझा मित्र दारू शी नफरत करणारा पण मित्रांच्या आग्रहास्तव बियर प्यायला लागलाय याची थोडी फार कल्पना मला होती. मी त्याचं वेळी त्याला या पासून थोडा दूर केलो असतो तर आज कदाचित तो दारू च्या विळख्यात अडकला नसता याचंच मला फार दुःख झालं. मानसोपचारतज्ञांच्या मते अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. त्यामुळे मला त्याची फार चिंता वाटू लागली म्हणून मी इतर मित्रांशी, माझ्या काही शिक्षकांशी चर्चा करून तसेच इंटरनेट च्या माध्यमांतून याबद्दल माहिती गोळा केलो. मिळालेल्या माहिती मधून मला काही आश्चर्यजनक गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या...!
alcohol-consumption-increasing-in-teenagers

               आपल्याकडे मतदान करण्यासाठी 18 वर्षे वय ठरवली आहे, लग्न करण्यासाठी 21 वर्षे वय ठरवलेली आहे मात्र मद्यपान करण्यासाठी 21 वर्षे वय असावी की 25 वर्षे वय असावी याबद्दल आजही वादविवाद सुरूच आहे. यामध्ये काही लोकं असे म्हणतात की, जर मतदानाचा हक्क 18 वर्षे आहे तर मद्यपान करण्यासाठी देखील वय 18 असावी तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की, जर लग्न करण्याची वय 21 असेल तर मद्यपान करण्याची वय देखील 21 करावी. पण मला असं वाटते की, आता ही वय 12 वर्षे असावी. कारण 12 वर्षाखालील तरुण देखील हल्ली पार्ट्या, Birthday, लग्न तसेच इतर ही कार्यक्रम मध्ये सर्रास दारू पितांना आढळतात. आणि ही बाब भावी पिढी साथ फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण मानसोपचारतज्ञांच्या मते अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. पण आता मला प्रश्न पडतो की, या तरुण वयातील मुलांना दारू चं व्यसन कसं जळलं असावं?
Beer

          “बियर म्हणजे दारू नाही, तू घेऊ शकतेस” असं सांगून मित्र आग्रह करतात आणि मग तो पण बियर घ्यायला सुरवात करतो. मात्र बीअरपासून सुरू झालेला प्रवास रम, व्होडका, व्हिस्की किंवा कधी कधी देशी दारूपर्यंत कधी पोहोचतो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. असच काहीसं माझ्या मित्रासोबत देखील झालं होतं. कित्येकदा तर स्वतः पालक देखील आपल्या मुलांना बियर प्यायला प्रोत्साहन करतात. कारण बियर मुळे ताण कमी होतो, झोप चांगली लागते, असे काही गैरसमज पसरलेले आहेत. बरं फक्त मुलं च दारू पितात असं देखील नाही तर यात मुलींचा प्रमाण खूप आहे. काही पालक देखील स्वतः आपल्या मुलींना दारू प्यायला परवानगी देतात. माझी खूप जवळची मैत्रीण आहे गौरी. मी तिला एकदा सहज गंमत म्हणून बियर प्यायला चल म्हटलो तर तिने मला म्हटलं, “आशु तू मला गंमत म्हणून जर का हे विचारत असशील तर वेगळी गोष्ट आहे परंतु तू खरचं म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत बियर प्यायला तयार आहे. कारण माझ्या घरी अशीही बियर प्यायची परवानगी आहे. परंतु मी आज पर्यंत कधीच पिली नाही. जर तू म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत बियर प्यायला येते.” यावर मी तिला म्हटलो, “बाळा गौरी मी नेहमी म्हणत असेन की आई वडिलांचं ऐकावं परंतु अशा चुकीच्या सवयी त्यांनी म्हटलं तरी देखील लावायचं नाही. मी ही दारू पित नाही आणि तुला ही दारू पिऊ देणार नाही.” माझी एक दुसरी मैत्रीण होती जिचं नाव मी सांगत नाही पण तिलाही सहज एकदा गंमत केलो चल दारू प्यायला म्हणून तर तिने ही मला म्हटलं की, मी दारू तर पित नाही पण बियर पिते. जेव्हा मी तिला बियर प्यायचा कारण विचारलो तर ती मला म्हणाली होती की, बियर ने आपली त्वचा मऊ होते. यात किती सत्यता आहे हे मला माहिती नाही. कारण, इंटरनेट वर याबद्दल मी देखील वाचलोय परंतु हे जरी सत्य असेल तरी देखील त्वचा मऊ करायला हे एकमात्र उपाय तर नाही ना.... Alovera चा गर काढून त्याचा रस बनवून त्यात हळदी आणि चवीनुसार थोडा मीठ टाकून फक्त 1 आठवडा ब्रश करायच्या आत पिलं तर तुमची त्वचा फक्त मऊ च होणार नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग, मुरूम सुद्धा गायब होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर Glow येईल. असे कित्येक उपाय आहेत. पण अशा भाकड कथा दंतकथेमध्ये सर्रास वाचायला मिळतात. आणि ह्याच दंतकथा कदाचित कारणीभूत ठरत असतात बियर चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे भावी पिढी साठी धोकादायक ठरू शकते.
Drinks

                            या किशोरवयीन मुलांचं दारू कडे Attraction का वाढत चाललं यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी काही मुलांशी संवाद साधला त्यावरून त्यांच्या असं निदर्शनास आलं की, लग्नसमारंभ, वाढदिवस वा इतरही घरगुती पार्ट्यांमध्ये आपल्या आई वडील किव्वा इतर नातेवाईक दारू पिऊन नाचतात, मज्जा करतात, है बघून किशोरवयीन मुलं Attract होतात. आणि मुलांना मिळालेलं शैक्षणिक अपयश, घरगुती तणाव किव्वा हल्ली दारू पिण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रेमभंग या सर्वांचा ताण कमी करण्यासाठी हल्लीची किशोरवयीन मुलं दारू कडे आकर्षित होतात. तसेच दारूची उपलब्धता हे देखील हल्लीच्या मुलांचं दारू पिण्याचं कारण आहे. आपल्या महाराष्ट्रात 2000 मध्ये दारूचे फक्त नऊ कारखाने होते तर आज त्यांची संख्या 70 ते 80 च्या घरात गेली आहे. किशोरवयीन मुलांची दारू पिण्याची सुरवात ज्या बियर पासून सुरू होते ती बियर 2004 ते 2005 या काळात सरासरी 2.5 लाख लिटर व्हायची तर आज तिचं 5 लाख लिटर म्हणजेच दुप्पट व्हायला लागली आहे यावरून च दारू ची उपलब्धता आपल्या लक्षात येते. National Health सव्‍‌र्हेच्या २००९ च्या आकडेवारीनुसार, १५ ते १९ वयोगटामधील मद्याचे प्रमाण हे मुलांमध्ये ११ टक्के आहे, तर मुलींमध्ये १ टक्का आहे. २० ते २४ वयोगटातील युवकांमध्ये हे प्रमाण २८.८ टक्के आणि युवतींमध्ये १.४ टक्के आहे. ही माहिती देणाऱ्या मानसशास्त्रज्ञ कीर्तीसुधा राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयीन मुली आणि युवतींमध्ये मद्यपानाचे प्रमाण वास्तवात अधिक आहे; परंतु सामाजिक दडपणामुळे मुली याबाबत खुलेपणाने बोलत नसल्याने ही आकडेवारी अर्धवट सत्य मांडत आहे.
                                                                                   अशा किशोरवयीन मुलांची वेळीच समजूत काढली नाही तर भावी पिढी व्यसनाधीन होण्यास फारसा वेळ लागणार नाही. पण हल्लीचे आई वडील मुलांची समजूत न काढता जर बियर दारू अथवा सिगरेट पितांनी आढळल्यास त्यांच्यावर रागावतात. मुलगा सिगरेट दारू किव्वा कुठलाही अमली पदार्थाचा सेवण करतांना आढळल्यास त्यांना रागवण्यापेक्षा त्यांचे तोटे त्यांच्या लक्षात आणून द्या मुलांशी मोकळा संवाद साधा. मुलांशी जर तुम्ही मोकळा संवाद साधला तर मुलांना बाहेर मित्रांची फारशी गरज भासणार नाही आणि वाईट मित्रांच्या संगतीने मिळालेले वाईट सल्ले त्यांना मिळणार नाही. आणि ते दारू च्या आहारी जाणार नाहीत. 

टिपः प्रस्तुत लेख मध्ये मी काही चुकीचं लिहिलं असल्यास मला मोठ्या मनाने माफ करा. प्रस्तुत लेख Loksatta News चा आधार घेऊन लिहिलेला आहे.

संपूर्ण लेख वाचल्याबद्दल तुमचा मी खूप आभारी आहो....काही चुकलं असेल किव्वा तुमच्या काही tips असतील तर त्या comment द्वारे मला नक्की कळवा....
धन्यवाद.....!