https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : fertilization

Followers

Showing posts with label fertilization. Show all posts
Showing posts with label fertilization. Show all posts

Menstrual cycle: मासिक पाळीचं सत्य

#पाळीविषयीबोलूया



मासिक पाळी


                                 आपण धर्म आणि संस्कृती मध्ये एवढे बंदिस्त झालोत की, याच्या पलीकडे जाऊन बरोबर काय आहे? आणि चुकीचं काय आहे? याचा आपण विचारच करू शकत नाही. दोन शब्दात सांगायचं झालं तर आपण सर्व वैचारिक गुलाम झालोत. परंतु याच वृत्तीमुळे आपल्या आई बहिणींना किती त्रास होत असेल याचा आपण कधी विचारच केला नाही. होय....! आजपर्यंत जो आपण समाजात मासिक पाळी बद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवीत आलो तसेच मासिक पाळी बद्दल समाजात उघडपणे बोलणाऱ्या आणि लोकांचे डोळे उघडू पाहणाऱ्यांना गप्प करत आलो. त्याच मासिक पाळी मुळे आपल्याच आई, बहीण, बायको, मैत्रिण यांना फक्त शारीरिक त्रास च नाही तर मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. यात दोषी फक्त एक पुरुष च नाही तर ती स्त्री सुद्धा आहे जी वर्षानुवर्षे फक्त आणि फक्त धर्म आणि संस्कृती च्या जाळ्यात अडकून वैचारिक गुलाम झालेली आहे आणि सोबतच आपल्या पुढच्या पिढीला देखील धर्म आणि संस्कृती च्या जाळ्यात अडकवून वैचारिक गुलाम बनवू पाहत आहे. या समाजाने जसं इतरही बोलणाऱ्यांना गप्प केलं होतं तसं मला ही गप्प केलं होतं आणि मी त्यावेळी गप्प देखील झालो होतो कारण कदाचित त्यावेळी माझी वय आणि हाथही लहान पडत होते. परंतु आज माझी वय सुद्धा लहान नाही आणि माझे हाथ ही लहान नाहीत म्हणून मी आज या विषयावर लिहायचं ठरवलं आहे. ही Blog Post वाचून कदाचित 100 मधून 99 लोकं मला शिव्या देतील पण ती 1 व्यक्ती वाचून स्वतःमध्ये परिवर्तन नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि मी सुद्धा त्याच एका व्यक्ती साठी लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. 

मासिक पाळी

                  मी साधारणतः इयत्ता सातवी मध्ये असतांना मला एक प्रश्न पडला होता. हे मासिक पाळी नेमकं काय असते? आणि याचा विंटाळ का बरं मानला जात असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी माझ्या इतिहासाच्या मॅडम ला हा प्रश्न विचारलो होतो. त्यावेळी मला त्यांनी मला रागवत गप्पं केलं होतं. मी तो प्रश्न विचारत असतांना माझा एक मित्र माझ्या शेजारी च उभा होता त्यामुळे त्याने मला या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. मला ते उत्तर ऐकून मला सुद्धा पाळी विषय फार किळसवाणं वाटलं. आणि मासिक पाळी ला विंटाळ मानायचं कारण देखील हेच असेल असं मला वाटायला लागलं होतं... मला त्या मॅडम नी गप्पं न करता जर माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं असतं तर कदाचित मी हा प्रश्न माझ्या मित्राला विचारलो नसतो. आणि त्याला असलेल्या अर्धवट ज्ञान मुळे दिलेलं उत्तर ऐकून मी माझ्या मनात पाळी विषयी चुकीची धारणा मनात धरून बसलो नसतो. जसं त्यावेळी माझ्या मनात मासिक पाळी विषयी चुकीची धारणा होती माझ्या मित्राच्या अर्धवट ज्ञान मुळे अगदी तसच या समाजात देखील मासिक पाळी विषयी चुकीचा धारणा आहे. कारण या विषयी कधीच उघडपणाने बोललं जात नाही आणि माझ्यासारख्या एखाद्या मुलाला हा प्रश्न पडला तर त्याला गप्पं केलं जाते. या समाजात मासिक पाळी विषयी गैरसमज होण्या मागचं आणखी एक कारण जे इयत्ता सातवी मध्ये असतांना अनुभवलोय ते म्हणजे, आपल्या अशा प्रश्नाचं उत्तर देण्यास जेव्हा मोठी माणसे नकार देतात तेव्हा आपण दुसऱ्या मोठ्या माणसांना न विचारता एखाद्या मित्रांना विचारतो ज्यांना त्याबद्दल अर्धवट ज्ञान असते आणि अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असते. याच अर्धवट ज्ञानामुळे समजात चुकीच्या धारणांना वेग वाढतो. 
                मी माझ्या मित्राच्या अर्धवट ज्ञान मुळे मासिक पाळी विषयी चुकीची धारणा मनात धरून बसलो होतो मात्र काही वर्षांनी जेव्हा मला कळलं की आपला सर्वांचा जन्म हा त्याच मासिक पाळीच्या प्रक्रियेमुळे होतो तेव्हा मला मासिक पाळी बद्दल आणखी नव्याने माहिती घेण्याची मनात इच्छा निर्माण झाली म्हणून मी परत मोठ्या मोठ्या शिक्षित लोकांना याबद्दल विचारू लागलो. आणि त्या सर्वांचं वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटलं कारण काही वर्षापूर्वी माझ्या मित्राने सांगितलेल्या उत्तराच्या पूर्णतः हे विरुद्ध होतं. ही मासिक पाळी किळसवाणी नाही आणि याबद्दल विंटाळ मानावा अशीही नाही तर, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यातून एका नवीन बाळाचा जन्म होतो. मग मला आणखी एक प्रश्न पडला की, जर ही मासिक पाळी एक नैसर्गिक क्रिया आहे आणि यातून एका नवीन बाळाचा जन्म होतो तर मग या क्रियेसाठी विंटाळ का पाळला जात असेल? याचं खरं उत्तर जाणून घेण्यासाठी मी काही अभ्यासकांना विचारलो तेव्हा मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आधी मासिक पाळी काय असते हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि मासिक पाळी काय असते? हे जाणून घेण्यासाठी गर्भधारणा किव्वा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाळाचा जन्म कसा होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे.
                     स्त्री च्या अंडाशय मधून निघणारा स्त्रीबीज अर्थात एक अंडज हा समागम(sex) दरम्यान पुरुषीय स्त्रीबीज अर्थात वीर्य द्वारे फलित (fertilization) होतो. याच प्रक्रियेमुळे गर्भ तयार होतो आणि एका बाळाचा जन्म होतो. परंतु जेव्हा हा स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळी हा रक्ताच्या स्वरूपात योनीमार्गातून बाहेर टाकला जातो ज्याने साधारणपणे 5 दिवस स्त्री/मुलीच्या योनी मार्गातून रक्तस्त्राव सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असे म्हणतात. तिच्या योनीमार्गातून याच 14.78 ते 73.93 मिली लिटर blood जाते. ही मासिक पाळी मुलीच्या वयाच्या साधारणपणे 12 ते 13 वर्षापासून सुरू होते तर वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत बंद होते. या दरम्यान त्या मुलीला अथवा स्त्रिला असह्य अशा वेदना होतात त्यामुळे तिला 4 ते 5 दिवस सक्त आरामाची गरज असते. कदाचित हेच कारण होतं की आधीची लोकं त्या स्त्री ला किव्वा त्या मुलीला घरातील कामे करु देत नसून तिला सतत आराम करायला लावत होते. आणि कालांतराने ज्ञानाच्या अभावामुळे काही लोकांनी मासिक पाळी आलेली स्त्री किव्वा मुलगी अशुद्ध होते हे जगजाहीर केलं. आणि त्यामुळेच या समाजात मासिक पाळी मध्ये विंटाळ पाळला जातो.

मासिक पाळी आणि समाज 

                                     हा समाज मासिक पाळी बद्दल विंटाळ पाळण्यामध्ये एवढं बंदिस्त झालाय की या पलीकडे जाऊन त्याला त्या स्त्रीला किव्वा त्या मुलीला किती मानसिक त्रास होत असेल याचा विचार देखील करण्याच्या मनस्थिती मध्ये राहिलेला नाही. एवढंच नाही तर आज स्वतः काही स्त्रिया देखील या मानसिक गुलामीचे शिकार झाले आहेत. तिला मासिक पाळीच्या काळात वेगळं च बसवतात वेगळं च झोपवतात. इतकंच नव्हे तर जेवायला सुद्धा वेगळं च देतात. आणि तिने जेवलेल्या प्लेट ला सुद्धा धुवून त्यावर पाणी शिंपडून आत ठेवलं जाते. ती ज्या ग्लास मध्ये पाणी पिते त्या ग्लास ला देखील कुणी शिवत नाहीत. आणि चुकीने तिला कुणी शिवलं तर त्या व्यक्तीला परत अंघोळ करायला लावतात. मासिक पाळी चालू असतांनी तिला कुठल्याही धार्मिक कार्यात भाग घेऊ देत नाही. कारण नसतांना सुद्धा तिला या सर्व गोष्टी निमूटपणे सहन कराव्या लागतात. पण लोकांना हे कळत नाही की मासिक पाळीचा आणि अशुद्धतेचा काहीही संबंध नाही. कोणे एकेकाळी हेच रक्त दैवी देणे समजले जायचे. स्त्रीची पुनर्निमितीची क्षमता या मासिक पाळीतील रक्तातून व्यक्त होत असते असे मानले जायचे आणि म्हणून रज:स्वला स्त्रीकडून पाळी चालू असतांना शेताची नांगरणी केली जायची. एवढेच नाही तर सहाव्या शतकात वराहमिहिर नावाच्या ऋषींनी देखील सांगितलं होतं की, “स्त्रीबीज फळले नाही तर ते मृत होते आणि गर्भाशयाच्या अस्तराबरोबर रक्ताच्या प्रवाहातून बाहेर टाकले जाते. एक प्रकारे स्त्री शुध्द होते आणि पुनर्निमितीसाठी पुन्हा एकदा तयार होते.” या आधारे बघितलं तर स्त्री/मुलगी ही मासिक पाळी दरम्यान अशुद्ध नाही तर शुद्ध असते. परंतु हा समाज अंधरूढी-परंपरा मध्ये एवढा आंधळा झालाय की त्याला आपलीच बहीण, आई, बायको, मैत्रीण मासिक पाळीच्या अंधरूढी-परंपरा मुळे कित्ती मानसिक त्रास सहन करते हे दिसत नाही आहे. Condoms तर रात्री 12 वाजे सुद्धा medical मधून हे घेऊन येतात परंतु आपल्या घरच्या आई, बहीण, बायको साठी sanitary pads आणायला मात्र यांना लाज वाटते. अरे ही लाज वाटायची गोष्ट नाही तर अभिमानाची गोष्ट आहे. माझं या समाजाला एकच सांगणं आहे की तुम्हाला तुमच्या आई बहीण बायको यांचं आयुष्य आरोग्यदायी बनवायचं आहे तर यावर उघडपणे बोलून त्यांना सहयोग करा. आणि मासिक पाळीची लाज नको तर अभिमान बाळगा.

Conclusion:-

                     शेवटी मी एवढंच सांगेन की, जर मासिक पाळी ही प्रक्रिया अशुध्द असेल तर तिच्यापासून जन्मलेली ही संपुर्ण दुनिया च अशुध्द आहे. आता ही मासिक पाळी शुद्ध आहे की, ही संपूर्ण दुनिया अशुध्द आहे याचा निर्णय मी या समाजावर च सोडतो.                   

            या Blog Post मध्ये काही चुकलं असेल किव्वा काही सुटलं असेल तर Comment द्वारे नक्की कळवा. कारण एवढ्या गंभीर विषयावर मी परिपूर्ण लिहू शकेन एवढा मोठ्ठा तर मी मुळीच नाही तरी देखील मी परिपूर्ण लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न केलो. ही Blog Post मी जरी लिहिलो असेन तरीपण या blog post चं सर्व श्रेय माझं नाही आहे तर या बाकीच्यांचं आहे:
हनुमंत थोरात(MLT, BSC)
मयुरी खानविलकर(MSW)
गायत्री पाटील (poly 2nd year)
वैष्णवी खलसे (BA 1st year)
वैष्णवी राऊत (Bsc 1st year)
काही लोकांचा समज होता की या विषयावर मुली बोलणार नाहीत परंतु जेव्हा मी हा विषय घेतलो तेव्हा या सर्व मुलींनी तसेच हनुमंत थोरात सरांनी स्वतः मला msg करून लिहिण्यास माझी पुरेपूर मदत केली. त्यामुळे य ब्लॉग चं सर्व श्रेय मी यांना देतो. वरील हनुमंत थोरात सर आणि मयुरी खानविलकर यांना सोडलं तर तिन्ही मुली वयाने फार लहान आहेत तरी देखील उघडपणे त्यांनीं हे विषय माझ्याकडे स्वतः येऊन मांडले. जर एवढ्याशा वयात जर य सर्व मुली उघडपणे बोलू शकतात तर मग तुम्ही का नाही? मासिक पाळी बद्दलचे सर्व गैरसमज दूर बाळगून ही एक नैसर्गिक क्रिया आहे असं सांगून जगासमोर उघडपणे बोला. मासिक पाळीची लोकांना लाज नको तर अभिमान वाटला पाहिजे एवढंच मला वाटते.
धन्यवाद...

तुमचाच 
आशु छाया प्रमोद