बेरोजगारी
मी आज Google वर what is the common problem of people's in India असं Search केलो तर उत्तर मध्ये Unemployment आलं. CMIE म्हणजेच Centre for Monitery Indian Economy च्या आकड्या नुसार May 2022 मध्ये Unemployment Rate 7.12% होता तर तोच June 2022 मध्ये वाढून 7.80% झालेला होता. बेरोजगारीच्या या वाढत्या आकड्यांना बघता खरचं भारतातील लोकांचा बेरोजगारी ही सामान्य समस्या झालेली दिसतेय. बेरोजगारी हा जेवढा भारतातील लोकांचा Common Problem आहे तेवढाच या Problem चा Common Solution देखील आहे. परंतु हा Solution तुम्हाला सांगायच्या आधी तुम्हाला Unemployment ची कारणे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण तुम्ही जो पर्यंत बेरोजगारी ची कारणे समजून घेणार नाही तो पर्यंत तुम्हाला बेरोजगारी चे उपाय देखील समजणार नाही.What is the reason of unemployment? बेरोजगारीचे कारण:
आपल्या समाजात एक खूप प्रचलित म्हण आहे, 'Your degree is just a piece of paper and your education is seen in your behaviour.' अर्थात तुमची पदवी फक्त एक कागदाचा तुकडा आहे आणि तुमचे शिक्षण हे तुमच्या योग्य आचरणामधून दिसते. परंतु योग्य आचरण ठेवण्यासाठी योग्य शिक्षण घ्यावं लागते आणि शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला त्या शिक्षणाचा पुरावा म्हणून एक पदवी प्राप्त होते. यावरून हे सिद्ध होते की, पदवी हा अप्रत्यक्षपणे तुमच्या आचरणाचा पुरावा आहे. मग ती पदवी मात्र कुठल्याही शिक्षण संस्थेची असू शकते किव्वा कुठल्याही सामाजिक संस्थेची असू शकते. याच पदवी च्या आधारावर तुम्हाला काम दिला जातो. आणि काम करण्यासाठी ते काम करण्याची आपल्याला आवड आणि ते काम करण्याचं कौशल्य आपल्याला मध्ये असायला हवं. परंतु हल्ली तरुण पदवी शिक्षण निवडतांना त्यांची आवड आणि क्षमता काय हे न बघता Scop कुठं आहे ते बघतात. मग कसं तरी पदवी प्राप्त करून ते काम शोधायला जातात परंतु ते काम करायची त्यांच्यामध्ये आवड आणि कौशल्य नसल्यामुळे त्यांना काम मिळत नाही आणि मिळालं च तर फार काळ टिकत नाही. बेरोजगारी वाढण्याचं हेच मुख्य कारण आहे.
मी आत्ता मागच्या आठवड्या मध्ये Living certificate साठी apply करायला College मध्ये गेलो होतो तर तिथे मला एक B.SC 1st year चा Student भेटला. तो मला म्हणाला, “दादा, मी माझं Admission CBZ(Chemistry-Boilogy-Zoology) या group मध्ये केलो परंतु मला आता CS(Computer science) या group मधून करायचं आहे.” मी त्याला Admission Transfer करायचं कारण विचारलो तर तो मला म्हणाला की, “Computer Science मध्ये खूप Scop आहे.” आता आश्चर्याची गोष्ट अशी की, त्याला Computer चं कसलंच Knowledge न्हवतं. शिवाय आवड देखील न्हवतीच फक्त त्याला कुणीतरी सांगितलं की computer science मध्ये खूप Scop आहे म्हणून तो करत होता. ०३ वर्षात तो देखील कसंतरी पदवी प्राप्त करेल आणि मग job शोधायला जाईल पण कसंतरी पदवी मिळविल्यामुळे वरून त्या विषयात आवड आणि कौशल्य नसल्यामुळे त्याला बरोबर जॉब मिळणार नाही. वरून फक्त आणि फक्त Scop असल्यामुळे जास्तीत जास्त Student त्याच विषयाकडे वळतात त्यामुळे Student ची संख्या जास्त आणि jobs कमी असल्यामुळे देखील काही पदवी प्राप्त Student बेरोजगार राहतात.
आता Job मिळत नाहीत म्हणून कित्येक मुलांचा कल हा Business कडे वळत चाललेला आहे. हे सुद्धा फार उत्तम आहे परंतु फक्त जॉब मिळत नाही म्हणून तुम्ही business कडे वळत असणार तर हे देखील फार धोक्याचे ठरेल. कारण Business करणे हे काही लहान मुलांचं खेळ नाही आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागते शिवाय पेशन्स सुद्धा महत्वाचा असते. त्यामुळे यातही तुम्हाला तुमची आवड बघावी लागेल शिवाय यात तुम्ही योग्य रीतीने स्वतःचा best देऊ शकता का हे बघावं लागेल. Job ला पर्याय म्हणून Business समझू नका हा देखील एक करियर चा मार्ग आहे ज्यात आवड आणि कौशल्य असेल तर यातही नक्कीच यश मिळेल.
करियर निवडतांनी स्कोप कुठं आहे हे न बघता आपली आवड आणि कौशल्य काय आहेत हे बघा आणि करियर निवडा म्हणजे तुम्ही बेरोजगार राहणार नाही. तुम्ही निवडलेल्या विषयात पदवी प्राप्त करून देखील दुर्दैवाने Job मिळाली नाहीत तरी देखील घाबरून जायचं काम नाही कारण तुमची त्या विषयात आवड आणि कौशल्य असल्यामुळे तुम्ही स्वतःचं काहीतरी करून नक्कीच आयुष्य घडवता येईल मी या आधी सुद्धा (करियर कसं निवडायचं) या blog post मधून सांगितलोय की चुकीचं करियर निवडल्या नंतर काय परिणाम होतात आणि करियर कसा निवडावा हे देखील या blog मध्ये लिहिलोय एकदा त्या लिंक वर जाऊन नक्कीच वाचा.
Conclusion:
करियर निवडतांनी च जर आपण आपली आवड, कौशल्य बघून करीयर निवडलं तर नक्कीच Unemployment Rate हा कमी होण्यास मदत होईल शिवाय तुम्हाला देखील तुमच्या आवडीचं काम करता येईल.
हा Article कसा वाटला याबद्दल Comment द्वारे नक्कीच कळवा आणि आवडल्यास Share करा....
धन्यवाद....
तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद

.jpeg)