एक अनोळखी वृद्ध व्यक्तीशी भेट......
![]() |
| Nagpur Bus Stop |
“हॅलो काका, कुठं राहता तुम्ही?” असं त्यांना विचारताच त्यांनी माझ्याकडे बघत विचारलं, “कोन आहेस बेटा तू?” मी त्यांना सांगितलो, “काका माझं नाव आशु आहे. मी खुप दुर वरून इथे जॉब साठी आलो होतो परंतु जॉब मिळाली नाही म्हणून जरा बरं वाटत नाही आहे. तुम्ही इथे एकटेच बसले दिसले आणि मला वाटलं तुम्हाला देखील काही समस्या असेल म्हणून तुमच्याशी बोलायला आलो.” “जॉब शोधायला आला आहेस पण तुझी वय फार जास्त दिसत नाही आहे. काय शिक्षण झालं आहे तुझं?” असं त्यांनी मला विचारलं म्हणून मी त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलो, “काका, माझं शिक्षण B.com Final चालू आहे.” यावर त्यांनी मला म्हटलं, “अरे मग शिक्षण पूर्ण कर आणि मग जॉब शोध मिळेल तुला नक्की जॉब घाई कशाला करतोस. वेळेच्या आत आणि योग्यते पेक्षा जास्त कुणालाही मिळत नाही. म्हणून आधी शिक्षण पूर्ण कर मग चांगली जॉब मिळेल तुला.” मी होकारार्थी मान हलवत म्हटलो, “होय काका मिळेल जॉब त्यासाठीच आता पासून प्रयत्न करणे चालू आहे माझं” “छान...! असच आयुष्यात प्रयत्न करणं कधीच सोडू नको बेटा” असं त्यांनी मला म्हटलं. “होय काका” असं म्हणत मी त्यांना परत बोललो, “काका माझं तर ठीक आहे पण तुम्ही देखील फार चिंताग्रस्त दिसत आहात, नक्की काय कारण या चिंतेचं?” माझं हे वाक्य ऐकताच ते परत चिंताग्रस्त झाले त्यामुळे त्यांना परत म्हटलो, “अहो काका, बोला हो.... बोलल्याने दुःख हलकं होईल तुमचं.” असं म्हणताच त्यांनी सांगायला सुरवात केली, “तुला माहिती आहे या जगातील anmol bhent प्रेम आहे.(अनमोल भेट काय आहे हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा)आमची अपेक्षा नाही आहे बेटा की आमच्या मुलाने आम्हाला महागड्या गाडी ने फिरवावे किव्वा महागडे भेटी द्यावे. आमची आमच्या मुलांकडून एवढीच एक माफक अपेक्षा आहे की, उतार वयात मुलाने दोन शब्द प्रेमाने बोलावे. उतार वयात आम्हाला आधार द्यावा. पण हल्ली च्या मुलांना एवढी वेळ कुठं असते. सकाळी उठून office मध्ये जातो आणि रात्री सुद्धा उशिरा येतो. त्याला वाटते की आई बाबांना पैसे दिले म्हणजे झालं पण बेटा आम्हाला पैशाची गरज नाही तर त्याच्या प्रेमाने बोललेल्या दोन शब्दांची गरज आहे.” यावर मी त्यांना म्हटलो, “अहो काका, हल्लीचं काम च तसं असतं नाही वेळ काढू शकत परिवारासाठी.” यावर ते म्हणाले, “असं नाही आहे बेटा की त्याला परिवारासाठी वेळ नाही आहे. त्याचा ऑफीस शनिवार ला बंद असतो आणि तो त्यादिवशी आपल्या परिवारासोबत म्हणजेच बायको आणि मुलांसोबत Hanuman Mandir मध्ये पूजा करायला जातो. कारण ती Hanuman चा परम् भक्त आहे.” त्यांना तिथेच थांबवून त्यांना विचारलो, “मग काका तो तुम्हाला सोबत का घेऊन जात नाही...तुम्ही Hanuman ला मानत नाही का? तुम्ही त्यांच्या परम् भक्त नाहीत का?” त्यावर ते पुढे सांगू लागले, “तसं नाही आहे बेटा, मी खूप मोठा भक्त आहो Hanuman चा अर्थात माझ्यामुळेच तो देखील हनुमानाची भक्ती करायला लागला. त्याचा Business सुद्धा हनुमान च्या कृपेने झालाय. पण त्याच्या पत्नीला आमच्या सोबत फिरायला कदाचित लाज वाटत असेल म्हणून तो आम्हाला घेऊन जात नाही. तो आम्हाला घेऊन जात नाही याला माझा विरोध नाही पण बेटा देवाला जेवढा वेळ देतो त्यामधला थोडा वेळ तरी आम्हाला द्यायला पाहिजे हिच माझी माफक अपेक्षा आहे.” “मग मला माफ करा काका यात तुमच्या मुलाची चुकी नाही यात तुमची चुकी आहे.” असं मी त्यांना म्हटलो. यावर त्यांनी मला विचारलं, “बेटा तो आम्हाला वेक देत नाही देवाला देतो यात माझी काय चुकी?” त्यावर मी त्यांना म्हटलो, “मला एक सांगा तुमचा मुलगा हरला तेव्हा त्यांची सांत्वना करायला काय करत होतात?” यावर त्यांनी मला उत्तर दिलं, “बेटा मी त्याला म्हणत होतो की, देवावर विश्वास ठेव तो सगळं ठीक करेल.” यावर मी त्यांना लगेच म्हटलो, “मग आता मला एक सांगा काका जेव्हा तो जिंकत होता तेव्हा तुम्ही त्याला काय सांगता होतात किव्वा त्याला काय करायला लावत होतात?” यावर ते म्हणाले, “बेटा तो जिंकला की त्याला आम्ही हनुमान चं नाव घ्यायला सांगत होतो आणि त्याला सांगत होतो की, देव सर्वस्व आहे तो कधीच कुणाचं वाईट करत नाही चांगलं च करतो फक्त त्याचं नाव घेत जा...” मी यावर त्यांना म्हटलो, “अहो काका, तुम्ही तुमच्या मुलाला लहानपणा पासून हेच सांगत आले की, तो हनुमान च सर्वस्व आहे तर तो तुम्हाला सर्वस्व का मानेल?” “मला काही समजलं नाही बेटा...” यावर काकांनी मला म्हटलं. मी त्यांना म्हटलो, “काका, लहानपणी आपला मन कोवळा असते हे तुम्हाला ही माहिती आहे. त्याच्या मनात आपण जे टाकू ते त्यालाच धरून बसतात मग त्याचा परिणाम काय होईल किव्वा काय नाही याचा विचार ते कधीच करत नाहीत. मुलगा हरला पडला की त्याला देवाचं नाव घ्यायला सांगतो पण त्याला सांगत नाही की उठायचं प्रयत्न केलास तर तू स्वतःच उठू शकतो. मग तो जिंकला की त्याला आपण नेहमी सांगतो की हे सर्व देवाची च कृपा आहे म्हणजे त्याचं सर्व क्रेडिट आपण देवाला देतो पण त्याला हे सांगत नाही की आई वडिलांचं आशीर्वाद सुद्धा त्यासाठी महत्वाचं आहे. या सर्व प्रकारामधून त्याला असं वाटायला लागतं की, देव हेच सर्वस्व आहेत आई वडील नाही म्हणून हल्ली ची मुलं आई वडिलांना नाही तर देवाला जास्त वेळ देतात त्यांनाच पूजतात. आई वडिलांना लाथा मारून देवाच्या पायावर डोकं टेकतात. कारण लहानपणा पासून सांगितलेलं असतं की, देव च सर्वस्व आहेत आई वडील नाही.” माझं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले “तुझं बोलणं अगदी खरं आहे बेटा मी माझ्या मुलाला लहानपणा पासून च देव हेच सर्वस्व आहे असं सांगत आलो आणि कदाचित हेच कारण असेल की तो आज देवाला वेळ देतो पण मला नाही.” दुपारचे ०२ वाजले होते आणि मला Nagpur वरून गावी यायचं होतं म्हणून मी त्यांना म्हटलो, “काका आता मला निघायला हवं गावी जायला मला ०३ तास लागतात.” असं सांगून मी त्यांचा निरोप घेतलो आणि ते ही त्यांच्या घरी जायला निघाले.
Conclusion:- मी असं म्हणत नाही की देवाची पूजा करू नका. त्यांना मानू नका पण आई वडिलांना लाथा मारून देवाच्या पाया पडणे हे तर चुकीचे आहे ना...देवाला माना, पूजा करा देवाची पण त्या आधी आपल्या आई वडिलांना वेळ द्या, त्यांच्याशी प्रेमाने दोन शब्द बोला. आई वडील च सर्वस्व असतात. आई वडिलांची सेवा केली तर कुठल्या मंदिरात सुद्धा जायची तुम्हाला गरज पडणार नाही.. तर देव स्वतः तुमच्या दारात येईल एवढी ताकद आई वडिलांच्या भक्ती मध्ये आहे.
देव म्हणोनी तयानी,
दगडास पुजला ।
मात्या-पित्यास वाडीत टाकुनी,
स्वर्गास मुकला ।।
✍️आशु छाया प्रमोद (रावण)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)