https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : April 2023

Followers

देवांच्या मुर्तींप्रती हिंदू कलाकाराची आस्था तर मुस्लिम कलाकारांचा बाजार का?

 मी नास्तिक नाही किव्वा मी आस्तिक सुद्धा नाही मी वास्तविक आहे त्यामुळे मी देवाचं अस्तित्व मानतच नाही. कारण डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांमधून देव मला कधीच जाणवलं नाही. आणि या पाच ज्ञानेंद्रियांमधून जी वस्तू, वास्तू, व्यक्ती किव्वा स्थळ जाणवत नाही त्याचं अस्तित्व मानता येत नाही. खरं तर देव ही माणसांनी तयार केलेली एक संकल्पना आहे जी जनसामान्यांसाठी असामान्य (चांगलं) काम करतो त्यांच्यासाठी वापरलेली आहे. इतिहासाची पाने चाळली तर वस्तुस्थिती काहीशी वेगळी दिसेल. असो आजचा आपला विषय हा नाही तर देवांच्या मूर्ती तयार करनाऱ्यांची देवाप्रती आस्था आहे की व्यवसाय आहे? हा विषय आहे.

           वरील फोटो मध्ये आपल्याला एक मुसलमान मुलगा गणपती ची मूर्ती बनवतांना दिसत आहे. या फोटो वरून काही लोकांचा असा वाद आहे की, लोकांनी फक्त देवाचा बाजार मांडलाय! खरचं मला हे फार आश्चर्यजनक वाटत आहे. खरचं तो मूर्ती तयार करून बाजारात विकतो आणि त्याच्यावर तो आपला उदरनिर्वाह करतो तर असं करून तो देवाचा बाजार मांडतोय काय? ठीक आहे जर तुमचे असे विचार असतील तर आम्ही समर्थन करतो मग मला एक सांगा, हिंदू लोकं सुद्धा बऱ्यापैकी हा व्यवसाय करतात! मग तेव्हा ही लोकं कुठं जातात? तेव्हा त्यांना हा बाजार नाही दिसत का? बरं या विषयावर जर आम्ही भाष्य केलं की, आम्हाला ते म्हणतात की, ते या व्यवसायामध्ये आपला उदरनिर्वाह करतात! मग मुसलमान सुद्धा हा व्यवसाय करून उदरनिर्वाह च करतो ना! तेव्हा तुम्हाला हा बाजार का दिसतोय? मग हिंदू लोकं सुद्धा बकरे विकतात मुसलमनांना, हिंदू लोकांच्या दुकानात सुद्धा दर्गा, अल्लाह चे फोटो सर्रास विकले जातात, मज्जिद समोर तर हिंदू लोकं त्यांच्या आस्थेचे म्हणा किव्वा पूजेचा समान विकतांना दिसतात तेव्हा मुसलमान लोकांनी कधीच यावर विरोध दर्शविला नाही. मग त्यांनी हिंदूंच्या मुर्त्या विकल्या तर तुमचा विरोध का? बरं काही लोकांचं असं ही म्हणणं आहे की, जर ते हिंदूच्या मुर्त्या विकून पैसे कमवितात मग आरतीला का येत नाहीत? परत माझा तोच प्रश्न आहे की, मग हिंदू लोकं सुद्धा मुसलमानांच्या आस्थांचा सामान विकतात ते लोकं मग मज्जिद मध्ये नमाज वाचायला का येत नाहीत? का ते दर्गा मध्ये जाऊन दुवा मागत नाहीत? खरं तर ते मुर्त्या तयार करून आपली कला सादर करतात. आणि उदरनिर्वाह करण्यासाठी ते त्यांना विकून एक व्यवसाय च करतात आणि भारतीय घटनेनुसार कलम 19 ते 22 मधील घटक “ई” नुसार कुणालाही कुठलाही व्यवसाय करण्याचा पूर्ण स्वातंत्र्य आहे. मग तो हिंदू असो की मुस्लिम तुम्ही त्यांना देवांचा बाजार मांडलाय असं म्हणू शकत नाही. खरं तर तुम्हाला तो मूर्ती बनवून विकतो आणि पैसे कमविते याची राग नाही तर तो एक मुस्लिम आहे याची जास्त राग आहे. आजच्या युगात सुद्धा तुम्ही हिंदू मुस्लिम यात भेदभाव करता हिच फार मोठी शोकांतिका आहे. खरं तर मुस्लिम लोकं आजही हिंदूच्या प्रत्येक सणामध्ये आनंदाने आणि उत्साहाने सहभागी घेतात मात्र त्यांच्या सणामध्ये हिंदू लोकं फारसे सहभागी होत नाही. खरं पाहिलं तर आज कित्येक मुस्लिम लोकं आपल्या हिंदू लोकांना जवळ करू लागत आहेत मात्र आपल्यामधलेच काही सो कॉल्ड हिंदू लोकं भेदभाव करतात. हिंदु मुस्लिम भेदभाव करणाऱ्या अशा हरामखोरांना भर चौकात नागडा करून मारलं पाहिजे. त्यांची जिवंत राहायची लायकीच नाही. 

         मागच्या वर्षी अल्ताब कडून एका हिंदू मुलीचा फार मोठा हत्याकांड झालेला होता पण असे अल्ताब फक्त मुस्लिम धर्मामध्येच नाही तर हिंदू धर्मा मध्ये सुद्धा आहेत. फक्त मुस्लीम च हिंदू मुलींवर बलात्कार करतात असं काहींचं म्हणणं आहे मात्र वस्तुस्थिति पाहिली तर तुम्हाला यापेक्षा काहीतरी वेगळंच चित्र दिसेल. 90 टक्के बलात्कार हे हिंदू हिंदू मध्येच होतात मात्र त्यातले अर्ध्या बलात्काराच्या नोंदी आब्रू वाचविण्यासाठी केल्या जात नाहीत तर 40 टक्के नोंदी आपलेच असतात म्हणून केल्या जात नाहीत आणि वाचले 10 टक्के नोंदी होतात मात्र कोर्टात आधीच्या एवढ्या केसेस पेंडींग असतात की त्यांच्या वेळेवर निकाल सुद्धा लागत नाही. मात्र एखाद्या मुसलमानाकडून असं कृत्य आढळलं तर काही सो कॉल्ड हिंदू लोकं हा विषय डोक्यावर घेऊन नाचतात ते न्याय मिळवून देण्यासाठी नव्हे तर फक्त मुस्लिमांना विरोध करण्यासाठी....! मात्र हाच प्रयत्न जाती-धर्माचा भेदभाव न बाळगता केला तर सर्व पीडितांना न्याय मिळवून देऊ शकते. म्हणून माझी एक विनंती आहे की, तो हिंदू असो किव्वा मुस्लिम, बौद्ध असो किव्वा सिख कुठलाही भेदभाव करू नका. त्याने आपलीच माणसे मारली जातील आणि त्याच्या फायदा राजकारणी लोकं आपल्या सत्तेची पोळी भाजण्यासाठी करतील.

                       एकदा एका सो कॉल्ड हिंदू ने मला माझा आडनाव विचारलं कारण मला जात आणि धर्माची चिड असल्यामुळे मी आडनाव लावत नाही. आणि मी हिंदू आणि मुस्लिम मध्ये भेद करू नका असं सांगत होतो म्हणून त्यांना वाटलं होतं की मी मुस्लिम आहे. म्हणून सांगतोय मी जन्मतः एक भारतीय आहे. माझे आई वडील हिंदू असल्यामुळे मला हिंदू धर्म मिळाला मात्र माझा रक्त मुस्लिम लोकांसारखा लाल च आहे. मला ही दोन डोळे, दोन हाथ, आणि दोन पाय आहेत अर्थात ते ही माणूस आहेत आणि मी देखील माणूस च आहे त्यामुळे मी हिंदू मुस्लिम मध्ये भेदभाव करीत नाही. 

                त्यामुळे देवांची मूर्ती बनविणाऱ्या हिंदूची आस्था आहे आणि देवांची मूर्ती बनविणाऱ्या मुस्लिमांचा देवाप्रती मांडलेला बाजार आहे असं म्हणून हिंदू मुस्लिम भेदभाव पसरवू नका. साई बाबांनी म्हटलं आहे, “सबका मालीक एक है” अर्थात देव हा एकच आहे फक्त आपण हिंदू त्यांना देव म्हणतो तर मुस्लिम अल्लाह! 

                      मी माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलोय. अशा या नाजूक विषयावर लिहिणारा मी काही फार मोठा विद्वान नाही त्यामुळे माझ्याकडुन नकळत काही चुका झाल्या असतील तर मला मोठ्या मनाने माफ कराल आणि यावर थोडा विचार कराल अशी अपेक्षा करतो...

धन्यवाद...!


तुमचाच लाडका लेखक

आशु छाया प्रमोद (रावण)