https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : July 2022

Followers

The Story Of Future Dancer

 Success

                         God of Cricketer किव्वा The best Cricketer कोण आहे असं विचारलं तर एक छोटासा मुलगा देखील न अडखळता सांगेल की God of Cricketer हा Master Blaster Sachin Tendulkar आहे. कारण तो succesful आहे. आणि त्याच्या Success मागचं कारण म्हणजे त्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात अर्थात त्याने त्याच्या skill वर काम केलं म्हणून तो आज succesful होऊ शकला. आता तुम्हीच विचार करा ना ज्या व्यक्तीला शिक्षणात गोडी च नाही आणि त्याला शिक्षणाचं काही येतच नाही त्याने 10 वर्षे सुद्धा शिक्षणात घालवले तरी देखील तो तिथे तो आपला best देऊ शकतो का? आणि जर तो आपला शिक्षणात best देऊ च शकला नाही तर त्याला success मिळेल का? परंतू जर त्याने त्याच 10 वर्षामधून फक्त 5 वर्षे जरी त्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात दिले किव्वा त्याला येणाऱ्या एखाद्या skill वर काम केले तर तो आपला तिथे best देईल आणि जर तो तिथे best देईल तर त्याला success होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. कारण या जगात प्रत्यकेच व्यक्तीमध्ये एक skill आहे त्यातच तो succesful होऊ शकते. आता उदाहरणार्थ बघितलं तर जर आपण पाण्यात पोहणाऱ्या मासोळी ला धावायला शिकवायचं प्रयत्न करू आणि सस्याला पाण्यात पोहायला शिकविण्याचा प्रयत्न करू तर ससा पोहणे तर शिकणार नाहीच कधी पण त्याला येणारी जी running ची skill आहे ते ही तो विसरून जाईल. आणि मासोळी सुद्धा धावणे शिकणार तर नाहीच नाही परंतु तिला येणारी पोहण्याची skill सुद्धा विसरून जाईल. हल्ली जिकडे तिकडे हेच चालू आहे. एका Engineer आई वडिलांना वाटते की आपले मुलं आपल्या पेक्षा ही मोठे Engineer व्हावेत. एका Doctor आई वडिलांना वाटते की आपले मुलं आपल्या पेक्षा ही मोठे Doctor व्हावेत. पण त्यांच्यामध्ये जन्मजात असलेल्या skill मध्ये किव्वा त्यांच्या आवडी कडे दुर्लक्ष होतो. मग ती कहावत तर ऐकलीच असणार ना, “धड गाढव ना ब्रह्मचारीं.” म्हणजे आई वडिलांमुळे ज्या क्षेत्राकडे लक्ष देतात त्यातही ते best देऊ शकत नाही आणि skill किव्वा त्यांच्या आवडीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांना ते ही करता येत नाही. मग काही मुले नशीब समजून पदरी पडलेलं काम करतात आणि काही मुले तर Dipression मध्ये जाऊन आत्महत्या करतात. आज मी तुम्हाला अशाच एका आई वडिलांची एक छोटीसी Story सांगतोय ज्यांनी फक्त स्वतःचा मुलगाच नाही गमावला तर या भारताने सुद्धा एक भावी Dancer गमावला.

Dancer

Sachin Tendulkar

It's not a suicide, it's murder.....

                          हि story कुठल्या छोट्याशा गावातील छोट्याशा घरातील मुलाची नाही तर ज्याचे आई वडील दोन्ही Doctor होते अशा सुशिक्षीत आणि मोठ्या शहरांच्या मोठ्या घरातील एका मुलाची आहे. ज्याने लहानपणा पासून Dancer व्हायचं स्वप्न बघितलं होतं. त्याला India's Best Dancer चा Aword जिंकायचं होतं. आणि तशी त्याची जिद्द ही होतीच. Dancing ही फक्त त्याची आवड न्हवती तर त्याच्यामध्ये Ek best Dancer व्हायची skill सुद्धा होती. फक्त गरज होती ती एका चांगल्या मार्गदर्शनाची. पण ते म्हणतात ना नशिबात जे असतं तेच घडतं. आई वडील हे दोन्ही Doctor असल्यामुळे त्या दोघांना हि वाटलं की आपला मुलगा हा आमच्या पेक्षाही मोठा Doctor व्हावा. त्या मुलाने आपली Dance Practice सोबत च चांगला अभ्यास करून 12th Exam मध्ये बऱ्यापैकी टक्के मिळवलीत. त्याच्या आई वडिलांनी त्याला MBBS ला Admission करून दिलं. त्यानेही आई वडिलांची इच्छा आहे म्हणून मन नसतांना सुद्धा हसत हसत Admission घेतलं आणि नियमित Collage ला जाऊ लागला. त्याने आपला अभ्यास आणि Dance Practice दोन्ही सोबत चालू ठेवली. MBBS ची exam चा result आला आणि त्या Exam मध्ये मात्र त्याने एकही subjects clear न्हवते केले. हे त्याच्या आई वडीलांना कळताच त्यांनी खूप ऐकवलं, मारलं सुद्धा आणि त्याची dance practice बंद करून नजर कैदेत ठेवलं आणि फक्त अभ्यास आणि अभ्यास करायला लावलं. त्या मुलाला कळलंच नाही की एवढं अभ्यास करून सुद्धा आपण paas का नाही झालोत. कारण त्याला Doctory चा अनुभव न्हवता असं ही नाही. घरातच दोन्ही आई वडील Doctor असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी अनुभव होता. एका doctor ला ज्या skill येतात त्या सर्व त्यालाही येत होत्या. परंतु मुळात त्याची आवड च न्हवती त्यामुळे तो एकही subjects clear करू शकला नाही. कारण फक्त Skill असून चालत नाही तर मनात त्याबद्दल आवड ही हवी जी त्याचं मध्ये न्हवती. आता त्याची Dance Practice बंद झाल्यामुळे आणि घरच्यांनी नजर कैदेत ठेवल्या मुळे तो पूर्णपणे Dipression मध्ये गेलेला होता. आणि याच कारणाने एका रात्री सर्व झोपल्यानंतर झोपेच्या Tablets खाऊन त्याने आत्महत्या केली. हि मला वाटते आत्महत्या नसून हत्याच आहे.

Suicide
                             माझा मुलगा माझ्याही पेक्षा मोठ्ठा Doctor व्हावा या इच्छापूर्ती साठी नाही फक्त त्या आई वडिलांनी आपला मुलगा गमावला तर या देशाने एक भावी Dancer सुद्धा गमावला. आज जसं God Of Cricketer म्हणून Master Blaster Sachin Tendulkar चं नाव Famous झालं आहे कदाचीत त्या मुलाचं देखील नाव Famous झालं असतं जर त्यानेही आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम केलं असतं. आवड आणि skill Dancer व्हायची होती पण आई वडिलांच्या इच्छापूर्ती साठी त्याने MBBS ला Admission घेतलं आणि ती कहावत आहे ना “धड गाढव ना ब्रह्मचारी” अगदी तसच नाही त्याला धड Doctor होता आलं आणि नाही Dancer. 

Conclusion:- 

                       माझं आई वडिलांना सांगणं आहे की, तुम्ही तुमच्या मुलांमध्ये काय skill आहेत त्याची काय आवड आहे हे तपासा आणि तेच त्याला करू द्या स्कोप कुठं आहे नि कुठं जास्त पैसा मिळतो हे बघू नका. कारण त्याच्यामध्ये skill नाही आवड नाही तो तिथे कधीच आपला best देऊ शकत नाही आणि जर त्याने best दिलं नाही तर तो कधीच success होऊ शकत नाही. त्या मुलांवर आपल्या स्वप्नांचं दडपण टाकू नका. कोवळं वय असतं त्याचं थोडं ही मनाविरुद्ध झालं की चिड चिड व्हायला लागते आणि जर कमजोर हृदयाचे असतील तर ते स्वतःचं काही बरं-वाईट सुद्धा करू शकतात.

                                     माझं मुलांना देखील सांगणं आहे की, तुमच्यामध्ये काय skill आहेत ते एकदा बघा तुमची आवड काय आहे ते बघा आणि नंतर च समोर काय करायचं ते करा. माझा मित्र हे करते म्हणून मी पण करतो किव्वा माझी मैत्रीण ते करते म्हणून मी पण तेच करतो असं करू नका. 

           आयुष्यात Success व्हायचं असेल तर Career निवडतांनी तुमच्यामध्ये असलेली Skill आणि तुमची आवड काय आहे? हे एकदा नक्कीच बघा कारण या दोन गोष्टी फार महत्वाच्या ठरवतात...


तुमचाच लाडका

आशु छाया प्रमोद